HomeTop Newsजावलीत आज दोन जणांचा कोरोना मुळे मृत्यू ;१० जण कोरोना बाधित.

जावलीत आज दोन जणांचा कोरोना मुळे मृत्यू ;१० जण कोरोना बाधित.

एकूण – १८५०, डिस्चार्ज १५५९, बळी ४६ ,अँक्टिव्ह २४५

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज ओझरे येथील पुरुष व निझरे येथील महिला अशा दोन जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.आज मंगळवारी सकाळी दहा जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. यामध्ये बामणोली तर्फ कुडाळ १, मेढा १,करंदी तर्फ कुडाळ ४, मोरावळे १,खामकरवाडी २,केळघर १, यांचा समावेश आहे. अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.

ग्रामदक्षता समित्या अधिक सतर्क करण्याची आवश्यकता

      जावली तालुक्यात सध्या २४५ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. पैकी रायगांव कोरोना केअर सेटरला ३३ तर मेढा डीसीएचसी सेंटरला ७ रुग्ण दाखल आहेत .उर्वरीत २०५ रुग्ण होम आयसोलेट झाले आहेत. होम आयसोलेट रुग्णांची जबाबदारी तितकीच महत्वाची आहे. अशा प्रत्येक कुटुंबाकडे रुग्णाची पूर्ण स्वतंत्र व्यवस्था आहे का किंवा सदर रुग्ण व त्यांच्या घरातील लोक योग्य खबरदारी घेत आहेत किंवा नाही. याबाबत दक्षता घेण्यासाठी आता गावपातळीवर दक्षता समित्यांची जबाबदारी वाढणार आहे.

           तालुक्यात आता या आठवड्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात दिसत आहे. परंतु होम आयसोलेट रुग्ण संख्या २०५ आहे. त्यांच्या पासून साखळी तयार होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्याच बरोबर सर्वानी मास्क व सोशलडिसटेंसिगच्या माध्यमातून स्वतः ची व कुटुंबातील सर्वांची काळजी घेणे आवश्यक आहे. नवीन संसर्ग साखळी तयार होणार नाही याची जास्तीत जास्त खबरदारी घेणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular