जावली तालुक्यात शुक्रवारी कोरोना मुळे दोघांचा बळी ;२४ कोरोना बाधित ७ मुक्त
एकूण – ६७८, बळी २१, डिस्चार्ज ५२०, अँक्टिव्ह १३७
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात शुक्रवारी दोन बळींची रेकाँर्डला नोंद झाली असून तालुक्यातील बळींची संख्या २१ वर पोहचली आहे.सदर बळी गेलेल्या व्यक्ती या मूळच्या जावली तालुक्यातील होत्या परंतु सध्या त्या सातारच्या रहिवासी आहेत. परंतु त्यांनी पत्ते जावली तालुक्यातील गावांचे दिल्याने त्यांची नोंद जावली तालुक्यात झाली आहे. या मध्ये भिवडी येथील एक पुरुष व सायगांव येथील एका महिलेचा समावेश आहे.अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.
कोरोनाने आता मेढा विभागात वक्र द्रष्टी फिरवली आहे .गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांचे अहवाल रात्री प्राप्त झाले. यामध्ये २४ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे.यामध्ये रिटकवली १,बीभवी ११,मेढा १०,आंबेघर १,गवडी १ यांचा समावेश आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी दिली आहे.
कोरोनाचे संकट लोकांनी गाभीर्याने घ्यावे. तहसीलदार
दिवसेंदिवस कोरोना चा फैलाव वाढत असून प्रत्येकाने त्यापासून स्वतः चा बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करावे असे आवाहन तहसीलदार शरद पाटील यांनी केले आहे.लोकांनी गर्दी करु नये.मास्क व सोशल डिस्टेन्सींग पाळावे.