जावलीत आज २७ जणांचा अहवाल कोरोना बाधित
एकूण – १७५६ , डिस्चार्ज १२५७, बळी ४४ ,अँक्टिव्ह ४५५
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज २७ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. यामध्ये ओझरे 10,
कुडाळ 10,मेढा 1,सोमर्डी 2,
बेलवडे 1,सायगाव 2,आलेवाडी 1,यांचा समावेश असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.
ही आकडेवारी तालुक्यातील रायगांव व मेढा येथील कोरोना केअर सेंटरवर घेण्यात आलेले स्वाब व तालुक्यात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या अँन्टीजेन टेस्ट मध्ये पाँझिटीव्ह अहवालांची आहे. याशिवाय खाजगी रुग्णालयात दाखल असणारे तसेच खाजगी ल्ँब मध्ये तपासणी करणाऱ्या कोरोना पाँझिटीव्ह रुग्णांची आकडेवारीत दररोज वाढ होत आहे.
नवरात्रोत्सवा बाबत प्रशासनाचे निर्बंध जारी ; कोरोना संसर्गाबाबत खबरदारी घ्यावी – तहसीलदार
सूर्यकांत जोशी कुडाळ -सध्या वाढत चाललेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गणेशोत्सवा प्रमाणेच नवरात्रोत्सवातील दुर्गादेवी उत्सव साजरा करणेबाबत प्रशासनाच्या वतीने निर्बंध जारी करण्यात आले आहेत. नवरात्रोत्सवात गर्दी मुळे कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याबाबत लोकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जावलीचे तहसीलदार शरदपाटील यांनी केले आहे.
तहसीलदार शरद पाटील यांनी नवरात्रोत्सवातील जनतेने पाळावयाच्या निर्बंधांबाबत आदेश जारी केले आहेत. यामध्ये नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा. दांडिया, गर्भा यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये.त्या ऐवजी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजना तसेच माझे घर माझी जबाबदारी या अभियानाबाबत जनजागृती करावी. सार्वजनिक मंडळांनी मंडप व देवीची प्रतिष्ठापणा करण्यासाठी शासनाची पूर्व परवानगी घ्यावी .
देखावे व जाहिरात पाहण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी कोरोना बाबत जन जागृती करणाऱ्या जाहिराती लावाव्यात. देणगी स्वेच्छेने दिली तरच घ्यावी.सार्वजनिक मंडळाच्या देवीच्या मूर्तीची उंची चार फूट तर घरगुती मूर्तीची उंची दोन फूट असावी. सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी पाच पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी थांबू नये.थर्मल स्क्रीनिंग व सँनिटायझर चा वापर करावा. तसेच मूर्ती शाडूच्या विरघळणार्या असाव्यात व मूर्तींचे शक्यतो जागेवरच विसर्जन करावे. आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येवू नयेत.गर्दी टाळून कोरोना संसर्ग टाळावा यासह अन्य निर्बंध जारी करण्यात आले आहेत.
मंदिरे खुली करण्यासाठी शासन आदेशाची जनतेला प्रतिक्षा ;
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊन मध्ये मंदिरांसह सर्वच आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश शासनाने जारी केले होते. आता अन्लाँक मध्ये बहुतांश आस्थापना सुरु झाल्या आहेत. परंतु महाराष्ट्रातील मंदिरे अजुनही भाविकांसाठी बंदच आहेत. आता नवरात्रात तरी देवाचे दर्शन होणार का.विजयादशमीला देवांच्या सिमोलंघना बाबत काय निर्णय होणार या बाबतच्या निर्णयाची प्रतिक्षा भाविकांना आहे. नवरात्रात आपल्या ग्रामदैवताचे नवरात्र उपवास करण्याची परंपरा आहे. अनेक गावात नवरात्र उपवास करणारे लोक दहा दिवस मंदिरातच वास्तव्य करतात. तर बहुतांश गावात घटस्थापना ते विजयादशमी पर्यंत प्रत्येक भाविक दर्शनासाठी मंदिरात जाऊन देवाला फुलांची माळ अर्पण करुन मंदिरा भोवती प्रदक्षणा घालण्याची परंपरा आहे. आता सध्या तरी सर्वत्र कोरोना संसर्गाचा बहर असून आगामी पंधरा दिवसांत कोरोनाला रोखण्यासाठी अधिक कडक निर्बंध लोकांनी स्वतः पाळण्याची आवश्यकता आहे. हा दहा दिवसांचा धार्मिक उत्सव काळजीपूर्वक पार पाडण्यासाठी प्रशासन व जनतेला अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे.
