Monday, April 6, 2026
HomeTop Newsजावलीत आज ३३ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह ;

जावलीत आज ३३ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह ;

एकूण – १६८० , डिस्चार्ज १२५७, बळी ४७ ,अँक्टिव्ह ३७९

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज ३३ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. यामध्ये कुसुंबी 4,मेढा 7,सावली  3,

ओझरे  3,भणंग 3,सरताळे  4, आंबेघर तर्फ मेढा 1,कुडाळ 1,

बामणोली तर्फ कुडाळ 4,

बेलवडे  1,केडंबे  1 अशा एकूण

एकूण  33  जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे. सुदैवाने आज कोणत्याही मृत्यू ची नोंद नाही.

माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाला  प्रतिसाद ५७% सर्व्हे पूर्ण

  तालुक्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य विषयक माहिती संकलित होत असून या माध्यमातून कोरोना ची लक्षणे असलेल्या रुग्णांचीही माहिती मिळणे शक्य होत आहे.

       जावली तालुक्याची एकूण लोक संख्या १०९२२८  इतकी असून  कुटुंब संख्या २३२४३इतकी आहे. ३७ टीमच्या माध्यमातून हे अभियान राबवण्यात येत आहे.आज अखेर १३२१६ कुटुंबांतील ६२३०९ लोकांची  आता पर्यंत तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ५४४५ एवढे लोक कोमाँर्बिड आहेत, सारी व तत्म आजारी लक्षणे १२४ जणांमध्ये आढळली आहेत.१०२ कोरोना संशयितांपैकी  ३५ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे.

        तालुक्यात या अभियानांतर्गत ५७ टक्के आरोग्य तपासणी पूर्ण झाली असून जिल्ह्यात याबाबतीत तालुका तिसर्या क्रमांकावर आहे.शासन आदेशानुसार या अभियानात शिक्षकांचा सहभाग घेण्यात आला आहे अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page