Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावलीत कोरोनाचा पुन्हा वाढतोय प्रादुर्भाव ; सतर्कता आवश्यकच ;

जावलीत कोरोनाचा पुन्हा वाढतोय प्रादुर्भाव ; सतर्कता आवश्यकच ;

२१५७, डिस्चार्ज १८९२, बळी ६२,अँक्टिव्ह २०३

     सूर्यकांत जोशी कुडाळ –   जावली तालुक्यात मंगळवारी रात्री १९ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. यामध्ये घरातघर ४, गांजे ६,कुसुंबी १, भिवडी १,सर्जापूर २,खर्शी त कुडाळ २,काटवली १,वाळंजवाडी १, दुंद १ यांचा समावेश आहे अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

             दरम्यान गेले आठ दिवस बाधितांचा आकडा आटोक्यात होता परंतू आज पून्हा बाधितांची आकडेवारी वाढली आहे. कोरोनाचा आता सामाजिक संसर्गाचा टप्पा असल्याने लोकांनी पावलोपावली काळजी घेऊन सुरक्षित राहणे आवश्यक आहे.विषेशतः गर्दीत जाणे टाळले पाहिजे. तसेच मास्क ,सोशलडिसटेंसिग व सँनिटायझर या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page