Monday, April 6, 2026
HomeTop Newsजावलीत कोरोनाचा २५ वा बळी ; कोरोनाने एक हजारचा टप्पा ओलांडला...

जावलीत कोरोनाचा २५ वा बळी ; कोरोनाने एक हजारचा टप्पा ओलांडला ; १०१०/२५

जावलीत कोरोनाने एक हजारचा टप्पा ओलांडला; १०१०/२५

 तालुक्यात कोरोनाचा २५ वा बळी ; आज २८ जण कोरोना पाँझिटीव्ह :

एकूण – १०१० , बळी २५, डिस्चार्ज ६७४ ,अँक्टिव्ह ३११

          जावली तालुक्यात मंगळवारी रिटकवली येथील ८५ वर्षीय व्यक्तीचा कोरोना मुळे बळी गेला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बळींची संख्या २५ वर पोहचली आहे. 

            तालुक्यात आज २८ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. या मध्ये मेढा ५, रिटकवली ५, भणंग १, सोनगांव २, नांदगणे ५, बामणोली कसबे ८, आंबेघर तर्फ कुडाळ २ यांचा समावेश असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.

        दरम्यान तालुक्याने एक हजार बळींचा टप्पा ओलांडला असून एकूण कोरोना बाधितांचा आकडा १०१० वर पोहचला आहे. गेल्या ९ दिवसात २४२  कोरोना बाधितांची वाढ झाली असून चार जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

कोविड व्यवस्थापनासाठी स्वयंसेवी संस्थांना मदतीचे आवाहन

               आज प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील मेडिकल ऑफिसर यांची बैठक घेण्यात येऊन कोविड व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाय योजनांचा आढावा घेण्यात आला.या बैठकीला उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला , तहसीलदार शरद पाटील ,गटविकास अधिकारी सतीश बुद्धे उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेत कोविड व्यवस्थापन साठी स्वयंसेवी संस्था मार्फत खालील नमूद गोष्टींसाठी मदत लागणार आहे .

1) मेढा येथे सुरू होणाऱ्या DCHC साठी मोठ्या क्षमतेचे वाशिंग मशीन 

2) प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय यांचे मागणी प्रमाणे प्रति केंद्र 30 Pulse oximeter व 20 thermometer gun

3) Ambulance निर्जंतुक करणेसाठी  मिनी फोगर मशीन – 7 

4) Disposal hand gloves

5) ऑक्सिजन Concentrater मशीन किंवा ऑक्सिजन सिलेंडर व ई सीजी मशीन  प्रति PHC 5

  या प्रमाणे मदत आवश्यक आहे.तरी दानशूर व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे अशी विनंती प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जावली तालुक्यातील  पाच गावात आज कन्टेंमेंट झोनचे निर्बंध लागू – मिनाज मुल्ला

       जावली तालुक्यातील  करंदोशी,काटवली, खर्शी तर्फ कुडाळ,मेढा प्रभाग १७ ,कुडाळ या  पाच गावात  कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती  व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार वरील पाच गावाला कोरोना बाधित रुग्ण आढलेल्या ठिकाणी  निर्धारित नियमानुसार कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत  असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page