मेढा पोलिस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव ; तालुक्यात कोरोनाची चौफेर बॅटिंग सुरुच ,आज १६ बाधित.
एकूण – ५८२, बळी १९, डिस्चार्ज ४४५, अँक्टिव्ह ११८
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात कोरोनाची जोरदार बँटिंग सुरू आहे. मेढा पोलीस ठाण्याच्या एका वरीष्ठ पोलीस अधिकारी व एक हवालदार यांच्या सह तालुक्यातील सोळा जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे.आज चार जण कोरोना वर मात करुन घरी परतले आहेत.
कुडाळ येथे आज खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोघांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. कुडाळ येथील ४९ जणांची आज अँन्टीजेन टेस्ट करण्यात आली यापैकी पाच जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. याशिवाय आनेवाडी १, सायगांव १, महिगाव ३ ,कोलेवाडी २ , जवळवाडी २ यांचा समावेश असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.
दरम्यान कुडाळ बाजारपेठेत कोरोना बाधित रुग्ण आढळल्या नंतर तहसीलदार शरद पाटील यांनी बाजारपेठेतील भाजीपाला विक्रेत्यांसह सर्व व्यापारी व दुकान दारांची अँन्टीजेन टेस्ट करण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार आज एकोणपन्नास जणांची आज तपासणी करण्यात आली. उर्वरित लोकांनी येत्या दोन दिवसात कुडाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.
स्वाबचे अहवाल उशिरा येत असल्याने कोरोना फैलावाचा धोका वाढणार
कोरोना बाधितांच्या हायरिस्क मधील लोकांच्या स्वाबचे अहवाल तीन दिवसांपासून प्रलंबित आहेत. त्यामधील कोणी कोरोना बाधित असेल तर कोरोना फैलाव वाढण्याची भीती जनतेतून व्यक्त होत आहे. मंगळवारी पुणे येथील लँबला पाठवण्यात आलेले स्वाबचे अहवाल अद्याप मिळाले नाहीत. वास्तविक हायरिस्क मधील लोकांचे कोरोना अहवाल तातडीने मिळणे आवश्यक आहे.
जावलीतील कुसुंबी गावाला कन्टेमेंट झोनचे निर्बंध लागू ; – मिनाज मुल्ला
जावली तालुक्यातील कुसुंबी गावात कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार कुसुंबी गावाला कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.