जावली तालुक्यात आज ३९ जणांचा अहवाल कोरोना बाधित सोनगांव व म्हसवेत कोरोनाचा शिरकाव
एकूण – ९०३ , बळी २१, डिस्चार्ज ६१६ ,अँक्टिव्ह २६६
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज ३९ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.आज पर्यंत कोरोना पासून दूर राहिल्या म्हसवे व सोनगांव गावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
रात्री उशिरा आलेल्या तसेच आज प्राप्त झालेले स्वाब चे अहवाल आणि आजच्या अँन्टीजेन टेस्ट मध्ये सोनगांव १, भिवडी १,रुईघर१, म्हाते खुर्द १,मेढा २२, जवळवाडी १,रिटकवली १,उंबरीवाडी २,खर्शी तर्फ कुडाळ ४,बिभवी ३,करहर १,म्हसवे १,आत्ता आलेल्या अहवाल नुसार
अशा एकूण ३९जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. तीन दिवसांत शंभर हून अधिक जण कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे लोकांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
मेढ्या मध्ये कोरोनाची घोडदौड अजुनही सुरुच आहे.मेढा शहरात कोरोना बाधितांचा आकडा १४२ वर पोहचला आहे. तालुका प्रशासन,आरोग्य विभाग व नगरपालिकेच्या माध्यमातून कोरोना साखळी तोडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान उद्या पासून आठ दिवस मेढ्यातील व्यापारी वर्गाने सुद्धा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतला आहे.
जावली तालुक्यात रायगांव चे कोविड सेंटर सज्ज
जावली तालुक्यातील महालक्ष्मी होमिओपॅथी काँलेज आणि हाँस्पिटल मध्ये आज पर्यंत कोरोना बाधितांसाठी सेवा देण्यात येत आहे. या कोविड सेंटर मध्ये एकूण २१७ बेड आहेत. याठिकाणी कोरोना पाँझिटीव्ह अहवाल आलेल्या सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार केले जातात.सध्या या ठिकाणी १११ कोरोना बाधितांवर उपचार सुरू असून १०६ बेड शिल्लक आहेत.अहवाल पाँझिटीव्ह येऊन लक्षणे नसलेल्या तसेच ज्यांच्या कडे राहण्याची स्वतंत्र सुविधा आहे त्यांना होम आयसोलेशन करण्यात येत आहे. एकूणच तालुक्यात कोरोना बाधितांचे वाढणारे आकडे चिंता वाढवणारे आहेत. आणि हा संसर्ग टाळण्यासाठी लोकांनी अधिक दक्ष राहणे आवश्यक आहे.
जावली तालुक्यातील तीन गावात आज कन्टेंमेंट झोनचे निर्बंध लागू – मिनाज मुल्ला
जावली तालुक्यातील सोनगांव, करहर , व मेढा प्रभाग ११ या तीन गावात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार वरील तीन गावाला कोरोना बाधित रुग्ण आढलेल्या ठिकाणी निर्धारित नियमानुसार कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.
सर्वांनी स्वतः ची जास्तीत जास्त काळजी घ्यावी. नियमांचे पालन करावे, मास्क व सोशल डिस्टेन्सींग ठेवावे असे आवाहन प्रशासना तर्फे करण्यात येत आहे.