एकूण २३९१, डिस्चार्ज २२७०, मृत्यू ६४, अँक्टिव्ह ५७
सूर्यकांत जोशी कुडाळ -जावलीत आठदिवसांत १०३ कोरोना बाधितांना डिस्चार्ज तर ४३ जण बाधित झाले असून एका कोरोना बाधिताच्या मृत्यू ची नोंद झाली आहे .तालुक्यात बुधवारी रात्री बारा जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. यामध्ये मामुर्डी ४, दुंद ४, नांदगणे १, सांगवी – कुसुंबी १, गांजे १, कुसुंबी १ यांचा समावेश आहे. अशी माहिती जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.
तालुक्यातील सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरु झाले आहेत. आठवडा बाजार भरत आहेत. तसेच आता पर्यटन स्थळे व मंदिरे खुली झाली आहेत. एस टी कडे प्रवासी वर्ग पुन्हा वळत आहे. लोक स्वतः काळजी घेत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाला आळा बसत असल्याचे दिसून येत आहेत.
तसेच आता कोरोना बाधितांना होम आयसोलेट होता येत असल्याने आजारा पेक्षा भयंकर ठरणारी संस्थात्मक आयसोलेशन होण्याची भीती लोकांच्या मनातून गेल्याने लोक स्वतः कोरोना चाचणी साठी पुढे येत आहेत.जे लोक नियमांचे पालन करुन स्वतः ची व इतरांची काळजी घेत आहेत. त्यांचा आदर्श सर्वानी घेणे आवश्यक आहे.