चार दिवसांत २४ जण बाधित
२३४८, डिस्चार्ज २१२५, बळी ६३,अँक्टिव्ह १६०
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याचे दिसत आहे. परंतू दररोज तालुक्यात काही प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकड्यांत या चार दिवसात वाढ होत आहे. त्यातच दिवाळी सणांमुळे बाजारपेठांमध्ये गर्दी होत असून खरेदीसाठी लोक एकमेकांच्या संपर्कात येत आहेत त्यातच थंडीचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे लोकांनी सावधगिरी बाळगुनच आपले दैनंदिन व्यवहार करणे हितावह ठरणार आहे.
दरम्यान तालुक्यात गेल्या चार दिवसांत २४ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. यामध्ये कुडाळ ८, रायगांव ४, बामणोली त.कुडाळ २, मेढा १, डांगरेघर २, हातगेघर २, कुसुंबी ३, गांजे २ यांचा समावेश आहे अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.
दरम्यान प्रवाशांच्या सेवेसाठी ग्रामीण भागातील एस टी बस सेवा सुरु करण्यात येत असून त्याचे वेळापत्रक प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. अशीही माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.