Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावलीत ग्रामपंचायत निवडणुक प्रचार शिगेला ; कुडाळची तिरंगी लढत लक्षवेधी

जावलीत ग्रामपंचायत निवडणुक प्रचार शिगेला ; कुडाळची तिरंगी लढत लक्षवेधी

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कुडाळ येथे पंधरा जागांसाठी तीन पँनल मध्ये अत्यंत चुरशीने होणारी लढत जिल्हयात लक्षवेधी ठरत आहे.

          तालुक्यातील निवडणुक लागलेल्या ७५ ग्रामपंचायती पैकी तब्बल ३७ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली.दुदुस्करवाडी या गावातून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. उर्वरीत ३७ ग्रामपंचायती पैकी भालेघर, बेलावडे, अंधारी /कास,कुडाळ, या गावातून एकही उमेदवार बिनविरोध निवडून आलेला नाही. उर्वरीत गावात काही जागांसाठी अंशतः निवडणूक होत आहे.

         निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. गाव कारभारी होण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. निवडणूक लागलेल्या गावात उमेदवारांचे व त्यांच्या समर्थकांचे फोटो बँनरवर झळकत आहेत. उमेदवार आणि कार्यकर्ते प्रत्येक घरातील मतदान आपल्याला मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत. मतांच्या बेरजेचे गणित जुळवण्यात रात्र संपून पहाट उजाडली जात आहे. अनेक गावात व्यक्तीगत द्वेश व प्रतिष्ठेसाठी बिनविरोध निवडणुक प्रयत्नांना अपयश आल असल्याचे बोलले जात आहे.

कुडाळ मध्ये प्रचारात रंगत

         तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कुडाळ ग्रामपंचायतीच्या पंधरा जागांसाठी ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील रयत पँनल,किसनवीर सहकारी साखर कारखाना संचालक चंद्रसेन शिंदे व सरपंच वीरेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पँनल व उप सरपंच गणपत कुंभार, संजय शिंदे, हेमंत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कुडाळ बहुजन विकास आघाडी यांच्या मध्ये ही तिरंगी लढत होत आहे. लक्ष्मी वाँर्ड मध्ये धनंजय केंजळे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज राहिला आहे. परंतू त्यांनी रयत पँनला आपला पाठींबा जाहीर करुन मतदारांनी आपल्याला मतदान न करता रयत पँनला मतदान करावे असे आवाहन केले आहे. ही निवडणूक जिल्ह्यात लक्षवेधी ठरली असुन निवडणुकिच्या प्रचारात बँनर,सोशल मिडिया, ध्वनी क्षेपक लावलेल्या गाड्या, रँली,वैयक्तिक गाठीभेटी यामुळे विधानसभेत च्या प्रचारा प्रमाणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारात चांगलीच रंगत आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page