Monday, April 6, 2026
HomeTop Newsजावलीत तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अधिक प्रभाव ; सध्या तालुक्यात ९१८...

जावलीत तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अधिक प्रभाव ; सध्या तालुक्यात ९१८ अॅक्टिव्ह रुग्ण

आज १६६ जणांचा अहवाल आज कोरोना पाॅझिटीव्ह

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांचे आकडे रोज नवा विक्रम प्रस्थापित करत आहेत.तालुक्यात सध्या ९१८  इतके अॅक्टिव्ह कोरोना बाधित आहेत.आज तब्बल १६६ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.

               प्रशासन सज्ज

             दरम्यान कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.जावलीचे उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या सह त्यांचे सहकारी  अहोरात्र मेहनत घेत आहेत.

        तालुक्यात सध्या रायगांव व मेंढा येथील कोरोना केअर सेंटर मध्ये १०६ बेडची व्यवस्था असून अजुनही आॅक्सिजन बेड वाढविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.गतवर्षी प्रमाणेच आता खाजगी डाॅक्टरांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे.तसेच खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांनी  कोरोनाची लक्षणे असणारा रुग्ण आढळल्यास प्रशासनाला कळवणे बंधनकारक आहे.अशी माहिती उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांनी दिली.कोरोनाच्या पहिल्या लाटेत महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडणार्या आशा व अंगणवाडी सेविका आता पूर्वीप्रमाणे सर्व्हे करणारे आहेत.

         जावलीकरांचा प्रतिसाद

            प्रशासनाच्या या प्रयत्नांना जनतेतून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे.कोरोना संसर्गाची साखळी तुटावी यासाठी मेढा,कुडाळ, केळघर या प्रमुख बाजारपेठांच्या गावांनी आठ दिवसांचा जनता कर्फ्यु आयोजित केला होता.त्याला व्यापारी व जनतेतून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.आता शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे काटेकोर पालन केले जात आहे.

  दि.२१ रोजी घेतलेल्या स्वाब मध्ये १६६ बाधित

            दरम्यान बुधवार दि.२१ रोजी घेण्यात आलेल्या स्वाबचे अहवाल आज प्राप्त झाले आहेत.या मध्ये बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३१ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे.यामध्ये अंधारी २, बामणोली कसबे ३, निपाणी १५, पावशेवाडी १० ,तेटली २ ,उंबरेवाडी १ .

          केळघर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४४ – आंबेघर तर्फे मेढा १, बहुले २२, बिभवी ७,बोंडारवाडी १, मेंढा ८, मोरावळे ३,ओझरे १, सावली १,

          कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ५२ – कुडाळ १०, पानस १, आंबेघर त. कुडाळ ३, भोगवली १ , दापवडी १, घोटेघर १,खर्शीबारामुरे १९,महु ३,म्हसवे१,रुईघर १,सांगवी १,सर्जापूर १,शेते ३,सोमर्डी ५,विवर १,

             कुसुंबी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १०- दुंद १,येकीव १ ,कुसुंबी २,म्हाते बु.५ ,मोहाट १.

            सायगांव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १८ – सायगांव ५ ,सरताळे १,खामकरवाडी १ ,प्रभूचीवाडी १,दरे बु. ३,दुदुस्करवाडी १ ,करंदोशी १, खर्शी त‌ कुडाळ१ ,रानगेघर १ ,सर्जापूर ३,

    दरम्यान मार्च २०२० पासून बुधवार दिनांक २१ पर्यंत जावली तालुक्यात एकूण ४३३६ कोरोना बाधित झाले होते.पैकी ३५०३ जण बरे होऊन घरी गेले.तर ८१ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.तालुक्यात आज अखेर ९१८ अॅक्टिव्ह रुग्ण संख्या आहे.

           तालुक्यातील बहुतांश गावांत कोरोनाने आपले पाय पसरले आहेत.त्यामुळे आपण स्वतः व आपले कुटुंब सुरक्षित रहावे यासाठी नियमांचे काटेकोर पालन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.आपल्या चुकीमुळे आपल्या स्वतः ला व इतरांना त्रास होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page