जावलीत दोन दिवसात पंचवीस कोरोना बाधित ; ९ डिस्चार्ज
एकूण – ६३४, बळी १९, डिस्चार्ज ४८५, अँक्टिव्ह १३०
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात सोमवारी एकूण १४ पैकी रात्री उशिरा आलेल्या अहवालातील सात तर आज मंगळवारच्या अहवालातील अकरा अशा कोरोना बाधिताच्या संख्येत १८ जणांची भर पडली आहे. तर ९ जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.
सोमवारी रँपिड अँक्शन टेस्ट अँन्टीजेन मध्ये कुडाळ येथील ४२ वर्षीय महिला, ४७ व २० वर्षीय पुरुष, गावडेवाडी येथील ८०,२१ वर्षीय पुरुष ७० वर्षीय महिला, सायगांव ५० वर्षिय पुरुष कोरोना बाधित असल्याने निष्पन्न झाले.मेढा येथील ४४ वर्षीय पुरुषाचा व कुडाळ येथील ८ वर्षीय मुलगा व ३५ वर्षीय महिला ,बामणोली तर्फ कुडाळ येथील ३५ वर्षिय पुरुष यांचा सोमवारी रात्री उशिरा कोरोना बाधित अहवाल आला होता. आज मेढा येथील २५,२६,३० वर्षीय पुरुष, २७ वर्षीय महिला ,जवळवाडी येथील २४ व २७ वर्षीय महिला , हुमगांव येथील ३८ महिला, ४८ वर्षीय पुरूष,बिभवी येथील ५० वर्षीय पुरुष आठ जण कोरोना पाँझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.असे आज अकरा जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे.
गणेशमूर्ती विसर्जन करताना गर्दी टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन
घरगुती गणपती विसर्जना दिवशी विसर्जन स्थळी लोकांनी गर्दी करु नये असे आवाहन जावली तालुक्याचे तहसीलदार शरद पाटील व गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी संयुक्त पत्रकाद्वारे केले आहे.
यावर्षी कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी शक्यतो घरगुती गणपती मूर्तीचे घरीच विसर्जन करावे. गावातील गणेश मंडळे तसेच तरुण मंडळांनी घरोघरी जाऊन मूर्ती व निर्माल्य संकलन करावे व विसर्जन करावे. विसर्जन स्थळी पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नयेत अशा मार्गदर्शक सूचना प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
जावली तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळला कन्टेंमेंट झोनचे निर्बंध लागू – मिनाज मुल्ला
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने
जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार बामणोली तर्फ गावाला कोरोना बाधित रुग्ण आढलेल्या ठिकाणी निर्धारित नियमानुसार कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.