सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील कुडाळ नजीक एका मंगल कार्यालयात सुरू असणाऱ्या लग्नसोहळयावर पोलिसांनी कारवाई केली.यावेळी कोरोना चाचणी केली नसल्याने वीस जणांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड करण्यात आला असल्याची माहिती मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि अमोल माने यांनी दिली.
संबंधितांनी नियमानुसार लग्न सोहळ्याची परवानगी घेतली होती.या सोहळ्याला नियमानुसार मर्यादित लोक उपस्थित होते.परंतु उपस्थितांनी कोरोना चाचणी करणे आवश्यक होते.हे सर्व नियम लोकांच्या सुरक्षिततेसाठी आहेत.त्यामुळे लोकांनी नियम पाळून सहकार्य करावे असे आवाहन सपोनि अमोल माने यांनी केले आहे.