Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावलीत सलग तिसऱ्या दिवशी कोरोना बाधितांच्या संख्येत घट;

जावलीत सलग तिसऱ्या दिवशी कोरोना बाधितांच्या संख्येत घट;

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहे.या आठवड्यात एक दिवस वगळता दोन अंकी आकड्यात बाधित आढळले आहेत.आज कोरोना बाधितांच्या तुलनेत तिप्पट डिस्चार्ज झाल्यानें दिलासा मिळाला आहे.

          जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि.२ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि. ३ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये ३७ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.आज ९० जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

      तालुक्यात आज अखेर एकूण कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या ८०७० झाली असून ७२९० जण कोरोनावर यशस्वी मात करुन सुखरूप घरी गेले आहेत.आता पर्यंत २०३ कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तालुक्यात ५७७ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.तालुक्याचा रिकव्हरी दर ९०.३३ आहे.मृत्यू दर २.५२ असून अॅक्टिव्ह रुग्ण दर ७.१५ आहे.

         आजच्या अहवालात कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ; तेटली ३, भणंग ३,केळघर २,मेढा १,ओझरे १,म्हसवे १,रुईघर १,शेते ३, धनकवडी २,दुंद १,गांजे १, गोंदेमाळ २,कुसुंबी ४,मालचौंडी २,वागदरे २,आनेवाडी ५, इंदवली १,महामुलकरवाडी १, सर्जापूर १. एकूण ३७.

कोरोना चाचणी दरम्यान चुकीचा पत्ता दिला जात असल्याने अडचणी

     दरम्यान कोरोना चाचणी दरम्यान अनवधानाने अथवा आपली ओळख लपविण्यासाठी काही जण चुकीचा पत्ता देत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे ज्यांचा कोरोना पाॅझिटीव्ह अहवाल येत आहे त्यांचा शोध घेण्याचे प्रशासनापुढे आव्हान उभे रहात आहे.अशा प्रकारांमुळे आता कोरोना चाचणी करताना आधारकार्डची नोंद घेतली जात आहे अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.भगवान मोहिते यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page