Monday, April 6, 2026
HomeTop Newsजावलीला कोरोनाचा आज मोठा दिलासा ;

जावलीला कोरोनाचा आज मोठा दिलासा ;

गुरूवारी सर्व ५९अहवाल निगेटिव्ह ;

 दोन कोरोना बाधितांचा मृत्यू

आज १११  जणांना डिस्चार्ज

एकूण – १८८३, डिस्चार्ज १७१२, बळी ५२ ,अँक्टिव्ह ११८

सूर्यकांत जोशी कुडाळ – गेले दीड महिना सातत्याने आगेकूच करणाऱ्या कोरोनाने गुरुवारी पूर्ण विश्रांती घेतली. बुधवारी तपासणी साठी पाठवलेले सर्व ५९ स्वाबचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली. दरम्यान गुरुवारी ४५ जणांचे स्वाब कोरोना चाचणी साठी पाठवण्यात आला आहे. 

     दरम्यान आज शुक्रवारी तब्बल १११ जण कोरोना मुक्त झाले आहेत. अजून ११८ रुग्ण अँक्टिव्ह आहेत.तालुक्यात एकूण २४७  बेड आहेत .रायगांव येथे २५ तर मेढा डीसीएचसी सेंटर मध्ये सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यात आता २१५ बेड शिल्लक आहेत.एकूणच आक्टोबर महिन्यात कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. धोका कमी झाला असला तरीही पूर्ण टळलेला नाही. त्यामुळे लोकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

 दोन बाधितांचे मृत्यूने धोक्याची घंटा

         या आठ दिवसांत कोरोना संसर्ग आटोक्यात आला आहे. परंतू मृत्यूंचे तांडव सुरुच आहे.बुधवारी खर्शी तर्फ कुडाळ व गुरुवारी कुडाळ येथील एका व्यक्तीचा मृत्यू  झाला आहे.परंतु याची नोंद अद्याप तालुका प्रशासनाकडे आलेली नाही. विशेषतः पूर्वीच्या आजारांची पार्श्वभूमी आणि वयोवृद्ध लोकांचे मृत्यू होत आहेत. त्यामुळे माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणून सर्वानी काळजी घेणं आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page