जावली तालुका कोरोना मुक्तीच्या दिशेने ; ४९ कोरोना मुक्त , ६ बाधित :
२३३३, डिस्चार्ज २१२५, बळी ६३,अँक्टिव्ह १४५
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज ४९ जण कोरोना मुक्त झाले असून शनिवारी रात्रीच्या अहवालात सात जण बाधित आहेत यामध्ये हातगेघर २, कुडाळ २, डांगरेघर २ यांचा समावेश आहे.या आठवड्यात खाजगी रुग्णालयात दाखल ९ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे .यामध्ये मेढा १ ,सायगांव २, दुंद २, कुडाळ २, आंबेघर तर्फ मेढा १ यांचा समावेश आहे. तसेच दि. २२/१०/२० रोजी म्हाते बु.।। येथील एकि कोरोना बाधिताच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.