HomeTop Newsजावली तालुका कोविड १९ विषेश वार्तापत्र

जावली तालुका कोविड १९ विषेश वार्तापत्र

जावली तालुका कोविड १९ विषेश वार्तापत्र

         ….सूर्यकांत जोशी कुडाळ-

जावली तालुक्यात कोरोनाचा चौथा बळी

बेलावडे येथील ४ पाँझिटीव्ह तर अन्य तेरा जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा.आज भणंग येथील १ बाधित .कोरोनाच्या दहशतीने बाजारपेठा ठप्प. जावलीत ४५ बाधित ६ ची कोरोनावर मात.बहुतांश रुग्ण मुंबई रिटर्न

परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज – तहसीलदार पाटील

       जावली तालुक्यातील वहागाव येथील कोरोना पाँझिटीव्ह असणाऱ्या सत्तरवर्षीय महिलेचा म्रुत्यु झाला.त्यामुळे तालुक्यातील कोरोना बळींची संख्या चारवर पोहचली आहे. बेलावडे येथील कोरोना पाँझिटीव्ह म्रत व्यक्तीच्या सहवासातील सतरा जणांपैकी चार जणांचे अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आले आहेत तर उर्वरीत अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान गेले अडीच महिने कोरोनापासून दूर असणाऱ्या कुडाळ, सायगांव, केळघर,मेढा व करहर विभागात गेल्या तीन दिवसांत  कोरोनाने चांगलीच दहशत निर्माण केली असल्याने येथील बाजारपेठांतील व्यवहार ठप्प झाले आहेत.

              जावली तालुक्यातील कोरोना पाँझिटीव्ह रुग्णांचा आकडा रविवारी दुपार पर्यंत ४४ वर पोहचला असून सहाजणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे तर चार जणांचा कोरोना मुळे बळी गेला आहे. रायगांव येथील संस्थात्मक क्वारंटाईन सेंटरमध्ये सध्या  ४६ जण दाखल आहेत. तालुक्यातील कोरोना रुग्ण आढळलेली तब्बल चौदा गावे कन्टेमेंट झोन मध्ये आहेत.जावली तालुक्यात सापडलेल्या बहुतांश कोरोना पाँझिटीव्ह व्यक्ती मुंबई हुन आलेल्या तसेच त्यांच्या संपर्काने बाधित झालेल्या आहेत. स्थानिक लोकांनी योग्य काळजी घेतल्यास कोरोना चा धोका संभव नाही. परंतु या आठ दहा दिवसात मुंबई सह अन्य ठिकाणाहून मोठ्या संख्येने लोक जावलीत आले आहेत त्यामुळे कोरोना पाँझिटीव्ह रूग्ण संख्या वाढत आहे .तरीही येणाऱ्या परिस्थिती चा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे असा ठाम विश्वास जावलीचे तहसीलदार शरद पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

             तालुक्यात सर्व प्रथम निझरे येथे मुंबई हुन आलेली व्यक्ती कोरोना पाँझिटीव्ह निघाली. तर या व्यक्तीच्या संपर्काने निझरेतीलअन्य ३व म्हाते येथील २ असे पाच जण बाधित झाले.या सहा जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्यानंतर जावली तालुका कोरोना मुक्त झाल्याचा आनंद प्रशासनासह सर्व जावली करांना झाला. परंतु चौथ्या लाँकडाऊन मध्ये शिथिलता मिळाल्याने अनेक मुंबई कर गावी परतले आणि यातील काही जण कोरोना पाँझिटीव्ह निघाले .बघता बघता आठ दिवसांत तालुक्यात कोरोना पाँझिटीव्ह रूग्णांची संख्या चव्वेचाळीसवर पोहचली. यातील चारजण कोरोना मुळे म्रुत्यु मुखी पडले.यातील बेलावडे पुरुष वय  ६८,व केळघर तेटली पुरुष वय ७५ वर्षे यांचे म्रुत्यु पश्यात पाँझिटीव्ह अहवाल आले होते.तर वरोशी पुरुष वय ५८ व वहागाव महिला वय ७० वर्षे या चारही जणांना पूर्वीच्या अन्य आजाराची पार्श्वभूमी होती.तालुक्यात कोरोना पाँझिटीव्ह सापडलले गाववार रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे निझरे ४,म्हाते २ ,वरोशी २ मयत १ ,गवडी ३ ,केळघर ६ ,सायगांव २ ,मोरघर ४ ,सावरी ६ ,बेलावडे ५ मयत १ ,निपाणी ३ ,केळघर सोळशी २ मयत १ ,आपटी १ ,आंबेघर तर्फ मेढा २ ,काटवली १ ,वहागाव १ , भणंग १. ही सर्व गावे कन्टेमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

        प्रशासनाचे आदर्शवत टीमवर्क

जावली तालुक्यात या कोरोना आणीबाणीच्या काळात कार्यक्षम अधिकारी लाभले .तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुध्दे,तालुका वैद्यकीय अधिकारी डाँ.भगवानराव मोहिते,यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी अत्यंत जलद हालचाली करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली तर याच वेळी सपोनि नीळकंठ राठोड व पोलिस उपनिरीक्षक संतोष चामे यांनी कायदा व सुव्यवस्थेची बाजू सांभाळली.

 आशा व अंगणवाडी सेविकांचे महत्वपूर्ण योगदान,दक्षता कमिट्यांची दक्षता.

        या कोरोना युद्धात अगदी सुरुवातीपासून आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका यांनी महत्वपूर्ण योगदान दिले.गावागावात बाहेरून येणाऱ्या लोकांवर या कोरोना योद्ध्यांची करडी नजर आहे. अनेकांनी  खरी माहिती लपवण्यासाठी दहशत दमबाजीचाही प्रयत्न केला पण या योद्ध्यांनी न डगमगता आपले कर्तव्य पाडले आहे. त्यामुळे प्रशासनाला तालुक्यात येणाऱ्यांची बित्तंबातमी मिळणे सहज शक्य होऊन वेळीच उचित कार्यवाही करणे शक्य होत आहे.या लढाईत ग्रामस्तरीय दक्षता कमिट्यांनी सुद्धा कोणताही भेदभाव न करता नियमांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले.

ऐन लढाईच्या वेळी ग्रामस्तरीय सैन्यात मरगळ

       ज्यावेळी कोरोना विरोधात पहिले व दुसरे लाँकडाऊन सुरू झाले त्यावेळी गावागावातील तरूण कोरोना योद्धे बनुन सज्ज झाले. गावचे रस्ते बंद करणे, गावात सँनिटायझर फवारणी, गोरगरिबांना अन्नधान्य वाटप करण्यात येत होते. तर बाजारपेठ कडेकोट बंद होती. नियमांची कडक अंमलबजावणी या सर्व गोष्टी गांभीर्याने घेतल्या होत्या. त्यावेळी फक्त निझरे येथे कोरोना चे आगमण झाले होते.आता आज अखेर तालुक्यात तब्बल चौदा गावांत कोरोनाने पाय पसरले असून चव्वेचाळीस जणांवर त्याने हल्ला करून चार जणांना चितपट केले आहे. असा आता निकराचा लढा सुरू आहे .त्यामुळे गावागावातील या योद्ध्यांनी मरगळ झटकून पून्हा सक्रिय होणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे शासनाने लाँकडाऊन ऐवजी अन् लाँक सुरू केल्याने व बाजारपेठा सुरू होऊ लागल्याने  प्रत्येकाने कोरोना पासून स्वसंरक्षण करणेच हितावह ठरणार आहे.आता कोरोना सोबत सुरक्षित अंतर ठेवून जगण्याची तयारी ठेवावीच लागले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular