Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यातआज १६ जण कारोना पाँझिटीव्ह ; ३२ जणांची कोरोना वर...

जावली तालुक्यातआज १६ जण कारोना पाँझिटीव्ह ; ३२ जणांची कोरोना वर मात.

एकूण – ११२२ , बळी २७, डिस्चार्ज ८०७ ,अँक्टिव्ह २९०

 सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज एकूण १६ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे.यामध्ये स्वाब घेण्यात आलेल्या कुडाळ ३, सायगांव १,मेढा ५, केळघर १, जवळवाडी १,तर  रानगेघर येथील  ५  जणांचा अँन्टीजेन टेस्ट अहवाल पाँझिटीव्ह आला आहे. अशी माहिती तहसीलदार शरद पाटील यांनी दिली आहे.

        जावली तालुक्यातील कोरोना बाधितांच्या उपचारासाठी लोकसहभागातून आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यासाठी केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्याचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी सांगितले

       दरम्यान लोकांनी शासनाने व आरोग्य विभागामार्फत घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे .सार्वजनिक ठिकाणी मास्क चा वापर व सोशलडिसटेंसिगचे पालन करून स्वतःला व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवावे असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांनी केले आहे.

जावली तालुक्यातील  दोन गावात आज  कन्टेंमेंट झोनचे निर्बंध लागू – मिनाज मुल्ला

       जावली तालुक्यातील रानगेघर व पिंपळी या दोन गावात  कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती  व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार वरील दोन गावात कोरोना बाधित रुग्ण आढलेल्या ठिकाणी  निर्धारित नियमानुसार  कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत  असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page