Monday, April 6, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यातील अवैध धंदे ताबडतोब बंद करा; सौरभ शिंदे ;

जावली तालुक्यातील अवैध धंदे ताबडतोब बंद करा; सौरभ शिंदे ;

पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर; कुडाळमध्ये अवैध व्यवसायाला यापुढे थारा नाही.

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात दारूबंदी असताना तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री होत आहे. तसेच जुगार व मटक्याचे अड्डे खुलेआम सुरू आहेत. यामुळे अनेक सर्वसामान्य कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. कुडाळ येथील एका अवैध दारू अड्यावर आपण स्वतः पोलिसांसह  छापा घातला आहे. पोलिसांनी हे अवैध व्यवसाय तातडीने बंद करावेत .अन्यथा यापुढे हे व्यवसाय बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जावली पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे यांनी दिला आहे.

            गेल्या काही वर्षांत कुडाळ मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू आहेत. अवैध व्यवसाय करणारे मालामाल होत आहेत तर या व्यवसायांच्या दुश्चक्रात अडकलेल्या लोकांची कुटुंबे देशोधडीला लागली आहेत. आपल्या नेतृत्वाखाली कुडाळ गावचा सर्वांगीण विकास करत असताना अशाप्रकारच्या अवैध व्यवसायांना कदापि थारा दिला जाणार नाही असा इशारा सौरभ शिंदे यांनी दिला आहे.

             याबाबतचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई,सपोनि मेढा व कुडाळ पोलीस दूरक्षेत्राकडे देण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page