Tuesday, April 7, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यातील कोणते गाव बनलय कोरोनाचा हाॅटस्पाॅट ; पहा आजचा न्यूज रिपोर्ट.

जावली तालुक्यातील कोणते गाव बनलय कोरोनाचा हाॅटस्पाॅट ; पहा आजचा न्यूज रिपोर्ट.

जावली तालुक्यातील छोटीमोठी गावे बनताहेत कोरोनाचा हाॅटस्पाॅट :

सूर्यकांत जोशी कुडाळ दि.८- जावली तालुक्यातील छोटीमोठी गावे दररोज कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनत आहेत, दररोज नवनवीन गावांची त्यात भर पडत आहे.गावातील छोटे मोठे सुख दुःखाचे कार्यक्रम कोरोना संसर्ग वाढवत आहेत का ?.की नियम न पाळल्याने कोरोनाला निमंत्रण दिले जात आहे.याचा विचार जनतेला करावा लागणार आहे.

      गेल्या महिनाभरात सोनगाव, नेवेकरवाडी, आंबेघर तर्फे मेढा, खर्शीबारामुरे, जवळवाडी, मेढा, कुडाळ, आनेवाडी यासह अनेक छोट्या मोठ्या गावात मोठ्या प्रमाणात लोककोरोना बाधित झाले आहेत.या आठवड्यात धोंडे वाडी कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनले असून आठ दिवसांत तब्बल ५० जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.या छोट्या वाडीच्या लोक संख्येचा विचार करता बाधितांना आकडा मोठा आहे.

             जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि.६ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि. ७ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये  ३६ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.तसेच आज ३७ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तालुक्यात आज अखेर कोरोनामुळे २३१ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून २५५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

        आजच्या अहवालात कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ; आंबेघर तर्फे मेढा १, जवळवाडी ६,मेढा १, नांदगणे १,खर्शी तर्फे कुडाळ १, कुडाळ २,धोंडेवाडी १६,महामुलकरवाडी २, सर्जापूर १, सरताळे ३, सोनगाव २ एकूण ३६.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page