Tuesday, April 7, 2026
HomeTop Newsजावली  तालुक्यातील चोऱ्या व अवैध  धंदे  रोखण्याचे ए पी आय तासगांवकर यांच्या...

जावली  तालुक्यातील चोऱ्या व अवैध  धंदे  रोखण्याचे ए पी आय तासगांवकर यांच्या पुढे  आव्हान

सूर्यकांत जोशी  कुडाळ – जावली  तालुक्यात सरकार मान्य दारू दुकानें बंद  आहेत. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध  दारू विक्री होते. या बरोबरंच अनेक ठिकाणी  जुगार व  मटका  राजरोस पणे  सुरु असल्याची उघड  चर्चा  होते. तसेच  गेल्या काही महिन्यात तालुक्यात छोट्या मोठ्या चोऱ्यांचे  प्रमाण वाढले  आहे. त्यामुळे जावली  तालुक्यात मेढा  पोलीस ठाण्याचे  नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष  तासगावकर यांच्या पुढे  तालुक्यातील अवैध  धंद्याचा  बिमोड करण्या बरोबरच चोऱ्यां रोखण्याचे  तसेच  झालेल्या चोऱ्याच्या तपासाची  चक्रे  फिरवण्याचे  मोठे  आव्हान आहे.

               व्यसनमुक्त युवक  संघांचे नेते व संघटक विलासबाबा जवळ  यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील महिलांनी संघटित  लढा  देऊन तालुक्यातील सरकार मान्य दारू दुकानें बंद  केली. दारू दुकानें बंद पडल्याने आपला  घर  धनी  तसेच  युवापिढी  या व्यसना पासून दूर रहावी  व सुखाचा  संसार  व्हावा अशी  या महिला  वर्गाची  अपेक्षा होती.परंतु नारी शक्तीच्या  या भावनाना  काही धनदांडग्यांनी सुरुंग लावून अवैध  दारू विक्री सुरु केली त्याला काही प्रमाणात छुपे राजकीय पाठबळ सुद्धा मिळाल्याची चर्चा  होते.या अवैध व्यवसायावर  वेळोवेळी पोलीस कारवाई होते.परंतु  हे व्यवसाय पुन्हा अधिक  जोमाने सुरु होतात. पोलिसांच्या कारवाई बाबत  सुद्धा अनेकदा  मंथली मंथन झाले आहे.

               गेल्या दोन वर्षात कुख्यात गुंड गजा  मारनेला  पकडण्या  पलीकडे  मेढा  पोलिसांच्या नावावर  फारमोठ्या पराक्रमाची  नोंद नाही. चोरीच्या  अनेक घटना  घडल्या  पण कोणत्याही चोरीचा  गुन्हा उघड  झाला नाही. गेल्या सहा  महिन्यात अनेक घर फोड्या झाल्या पण तपास  शून्य आहे. दोन महिन्यापूर्वी कुडाळ येथे  एकाच  रात्रीत चोरट्यानी चार  घरे  फोडली होती. त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही नाही. या चोऱ्याचा तपास  ज्या अधिकाऱ्यांकडे दिला आहे ते अधिकारीच गायब  आहेत. गेल्या दोन वर्षात कुडाळ पोलीस ठाण्याला पी एस आय मिळाले नाहीत. सध्या  ज्यांची नेमणूक  आहे. ते हजर  झाले पण पुन्हा कधी  दिसलेच  नाहीत. तालुक्यातील अनेक पोलीस दूरक्षेत्रे पोलीस कर्मचाऱ्यां अभावी  बंद  आहेत.जावली  तालुका हा भौगोलिक व दळणवळंनाच्या दृष्ट्या दुर्गम आहे अशा  परिस्थितीत मेढा  पोलीस ठाण्याचे नूतन स. पो. नि. संतोष  तासगावकर यांच्या पुढे  तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे मोठे  आव्हान आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page