जावली तालुक्यातील बेलावडे येथील मयत व्यक्ती कोरोना पाँझिटीव्ह;संपर्कातील अनेक जणांचे धाबे दणाणले ;कुडाळ विभागात कोरोनाची एन्ट्री. ग्रामस्थांच्या जागरूकतने मोठा अनर्थ टळला
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील बेलावडे गावातील मयत व्यक्ती कोरोना पाँझिटीव्ह असल्याचा अहवाल बुधवारी रात्री उशीरा प्राप्त झाला. दरम्यान ही मयत व्यक्ती गावच्या सरपंचांचे घरातील आहे.तसेच सदर मयत व्यक्तीच्या आजारा बाबत गुप्तता ठेवल्याने सरपंचांसह अनेकजणांचा मयत व्यक्तीशी जवळुन संपर्क आला असल्याची माहिती स्थानिक लोकांकडून मिळत आहे. गेले दोन महिने सर्वत्र हाहाःकार माजवणार्या कोरोनाची एन्ट्रीने
बेलावडे सह संपूर्ण कुडाळ विभागातील जनतेचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान अत्यवस्थ असलेल्या व्यक्तीला ग्रामस्थांनी सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील रूग्णालयात उपचारासाठी नेहले. परंतु उपचारा पूर्वीच सदर व्यक्ती मयत झाला असल्याचे सांगून बाँडी घरी घेऊन जाण्याचा अनाहुत सल्ला देण्यात आला.परंतु जागरूक ग्रामस्थांनी सदर व्यक्तीच्या कोरोना तपासणीसाठी दबाव आणला व पुढील अनर्थ टळला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सदर व्यक्ती, मुलगा, सून व अन्य सहा असे नऊ जण दि.१९ मे रोजी मुंबई हुन बेलावडे येथे दाखल झाले. त्यांना होमक्वारंटाईन करण्यात आले होते. परंतु सदर व्यक्ती नामांकित बँकेतून सेवानिवृत्त झाली असल्याने मान्यवर होती. त्यातच पँरालेसेस झाला असल्याने कुटुंबातील अनेक व्यक्ती त्यांच्या सेवेत व संपर्कात होत्या.सदर व्यक्तीला गावी आल्यापासूनच ताप येत होता व अस्वस्थ वाटत होते. परंतु हा आजार आरोग्य सेवक तसेच अन्य लोकांपासून लपवण्याचा प्रयत्न झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान मंगळवारी आजार बळावल्याने तातडीने रूग्णालयात नेहण्यात आले. परंतू यावेळी संपर्कातील संबंधितांनी कोणतीही काळजी घेतली नाही.दरम्यान शासकीय रुग्णालयात नेहल्यानंतर सदर व्यक्ती मयत असल्याचे डाँक्टरांनी सांगितले. सदर व्यक्ती मुंबई हुन आली असल्याने कोरोना संशयित असल्याने मयताच्या घशातील स्वँब घेण्यात आला होता. संभाव्य संशयित असल्याने मयत व्यक्तीवर माहुली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान मयत व्यक्ती कोरोना पाँझिटीव्ह असल्याचा अहवाल बुधवारी रात्री उशिरा येताच बेलावडे सह पंचक्रोशीतील लोकांच्या पायाखालची वाळू सरकली.दरम्यान बेलावडे गावाला तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे , सपोनि निळकंठ राठोड, पोलिस उपनिरीक्षक संतोष चामे, आरोग्य सेवक कुलकर्णी बी.व्ही.यांनी तातडीने भेट देऊन मयत व्यक्तीच्या जवळून संपर्कात आलेल्या सतरा जणांना इंस्टीट्युशनल क्वारंटाईन तर ३४ जणांना होमक्वारंटाईन केले. दरम्यान मयत व्यक्ती व संबंधितांना बेलावडे येथे सोडण्यासाठी आलेला वाहन चालक पून्हा मुंबई ला गेला आहे. तर अन्य दोन जण सातारमध्ये असल्याची माहिती सांगण्यात आली.या घटनेनंतर जावली तालुक्याचे तहसीलदार शरद पाटील यांच्या पत्रानुसार तहसीलदार संपूर्ण बेलावडे गाव सील करून उप विभागीय अधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांच्या आदेशानुसार संपूर्ण बेलावडे गाव कन्टेमेंट झोन म्हणून घोषित केले आहे.त्यामुळे बेलावडे गावात स्मशान शांतता पसरली असून ग्रामस्थ चांगलेच धास्तावले आहेत.
फोटो. 1. बेलावडे गावचे प्रवेश द्वार सील करण्यात आले आहे. 2,गावात असणारा शुकशुकाट.
Very good report. The dead person was my next door in new MUMBAI Airoli. I wanted to know whether this dead man was infected covid19 at in New MUMBAI itself? Ya he infected on travel? Ya infected inside his vehicle? On 19th May he left at 9.45 am. With his wife and daughter.
Am worried. Can u inform me whether he infected in new MUMBAI or not. Thanks. Dhanyawad.
Very good report. The dead person was my next door in new MUMBAI Airoli. I wanted to know whether this dead man was infected covid19 at in New MUMBAI itself? Ya he infected on travel? Ya infected inside his vehicle? On 19th May he left at 9.45 am. With his wife and daughter.
Am worried.