Monday, April 6, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यातील मेरुलिंग घाटात इर्टिका कारला झालेल्या भीषण अपघातात ३ ठार, ५...

जावली तालुक्यातील मेरुलिंग घाटात इर्टिका कारला झालेल्या भीषण अपघातात ३ ठार, ५ जखमी

कुडाळ ता २५ :-जावळी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असणार्या श्री क्षेत्र मेरुलिंग घाटा मध्ये नरफदेव येथून रेशनिंग आणण्यासाठी निघालेला इर्टिका गाडी कड्यावरुन कोसळुन झालेल्या भीषण अपघातामधे एका महिलेसह 3 जण जागीच ठार झाले तर इतर ५ जण किरकोळ जखमी झाले ,

         याबाबत सविस्तर माहिती अशी की,  नरफदेव येथील ग्रामस्थ व महिला सकाळी साडे सात वाजता रेशनिंग आणण्यासाठी  दरेखुर्द येथे निघाले होते .येथील  मेरुलिंग घाटामध्ये एका धोकादायक वळणावर चालकाचा गाडिवरील ताबा सुटला.  या ठिकाणी रस्ता अरुंद असल्यामुळे तसेच रस्त्याला संरक्षक भिंत नसल्याने गाड़ी थेट  कड्यावरून दीडशे फुट खोल कोसळली. ही गाडी दहा ते बारा पलटी खावून वळून येणाऱ्या खालच्या रस्त्यावर पुढील बोनेट वर उभी राहिली होती.या वेळी पाठिमागुन गाड़ीमध्ये येणाऱ्या काही ग्रामस्थानी हा अपघात पाहिला तेव्हा गाड़ीचा अक्षरशा चेन्दा मेंदा झाला होता . गाडीतून जखमी लोकांना बाहेर काढताना लोखंडी पहार आणून गाड़ी फोडून त्यातून बाहेर काढावे लागले.त्यावेळी गाडीतील सर्व जण अक्षरशः गुदमरले असल्याचे दिसत होते. या अपघातात  चालक शिवाजी जगन्नाथ साबळे वय ४०,लीलाबाई गणपत साबळे वय ५५,सागर सर्जेराव साबळे या तिघांचा दुर्देवी म्र्युतु झाला तर मेरुलिंग गावचे माजी उपसरपंच वसंत साबळे वय ५५,पांडुरंग साबळे वय ५६,महेश साबळे वय १९,सचिन साबळे वय २८ व इतर एक जण किरकोळ जखमी झाले,जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र सायगाव येथे उपचार करून घरी सोडले तर तिघांचे मृतदेह शवविछेदन करण्यासाठी मेढा येथील शासकीय रुग्णालयात पाठवून दिले,या घटनेची नोंद मेढा पोलिस स्टेशनला झाली असून सपोनि. अमोल माने यांनी स्वतः घटनास्थली भेट दिली.अधिक तपास पीएसआय कदम करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page