Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यातील म्हसवे सोसायटीत सत्तांतर ; माजी सभापती सौ.अरुणा शिर्के...

जावली तालुक्यातील म्हसवे सोसायटीत सत्तांतर ; माजी सभापती सौ.अरुणा शिर्के यांच्या पॅनलचा दणदणीत विजय

सूर्यकांत जोशी कुडाळ ; जावली तालुक्यातील म्हसवे विकास सेवा सोसायटी घ्या पंचवार्षिक निवडणूकीत  आमदार श्रीं.छ.शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक जावली पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.अरुणा शिर्के व अजय शिर्के यांच्या नेतृत्वाखालील जननी देवी अजिंक्य पॅनेल ने  माजी उपसभापती तानाजी शिर्क संजय शिर्के  आदी सर्वांनी एकत्र येऊन शेतकरी विकास पॅनलला व्हाईट वाॅश देत सर्व जागा जिंकून सोसायटीत सत्तांतर घडविले . 

            या निवडणुकीमध्ये अजय शिर्के यांच्या तरुण तडफदार नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनता विरुद्ध सर्व जुनी राजकीय मातब्बर मंडळी अशी लढत झाली. या लढतीमध्ये अजय शिर्के यांचे नेतृत्वाखाली सर्वसाधारण पुरुष गटातील श्री.मानसिंग कोंडीबा गोडसे, विठ्ठल विष्णू शिर्के, मारुती पांडुरंग शिर्के,हणमंत विठोबा चव्हाण, बाळू विष्णू सावंत, दत्तात्रय शिवाजी शिर्के, ज्ञानेश्वर आनंदराव शिर्के, रणजीत बापू शिर्के यांचेसह महीला गटातून सौ. जयश्री दिलीप शिर्के व उषा सदाशिव शिर्के हे सर्व बहुमताने व मागासवर्गीय गटातून श्री. नारायण मनू कांबळे हे बिनविरोध निवडून आले.

            या निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्यासाठी पंचायत जावली पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.अरुणा अजय शिर्के यांचे नेतृत्वाखाली आणि श्री. विजय शिर्के, ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ विजया पवार, उपसरपंच श्री अशोक शिर्के आणि श्री. यशवंत शिर्के, श्री.संभाजी चव्हाण,श्री.अरविंद शिर्के, अनिल शिर्के  ग्रामपंचायत  सदस्य लक्ष्मण शिर्के, प्रशांत शिर्के,जयवंत चव्हाण, विजय शिर्के, पोपट चव्हाण,पिंटू पवार यांचेसह तानाजी गायकवाड, ज्ञानेश्वर पवार, योगेश सावंत,तुळशीदास शिर्के, आनंदा गायकवाड, ज्ञानेश्वर शिर्के, यशवंत पवार, प्रकाश शिर्के, राजेंद्र शिर्के, संजय शिर्के,सुभाष शिर्के, मंगेश शिर्के ,यांचेसह तरुण कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

          यापुढील काळात सर्व सामान्य सभासदांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवून शेतकर्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे माजी सभापती सौ.अरुणा शिर्के यांनी विजयी सभेत बोलताना सांगितले.

           विजयी उमेदवार व पॅनल प्रमुखांचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page