जावली तालुक्यातील रेंगडी येथील चार जण ओढ्याला आलेल्या पुरात वाहुन गेले
कुडाळ -शेतातून कामपूर्ण करून घरी परतणारे चार जण ओढ्याला आलेल्या पुराचा पाण्यात वाहून गेले .असल्याची माहिती मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि अमोल माने यांनी दिली.
या दुर्घटनेत मौजे रेंगडेवाडी येथील 2 पुरुष व 2 महिलांचा समावेश आहे.
1.सहदेव गणपत कासुर्डे वय- 60 वर्ष
2.भागाबाई सहदेव कासुर्डे वय-50 वर्ष
3.तानाबाई किसन कासुर्डे वय-50 वर्ष
4. रविंद्र सहदेव कासुर्डे वय- 30 वर्ष अशी त्यांची नावे असल्याचे समजते.दरम्यान पुलाचा भराव वाहुन गेल्याने मेढा ते महाबळेश्वर दरम्यान वाहतूक पूर्ण बंद असल्याने तसेच राञीचा अंधार असल्याने पोलिसांसह शासकीय यंञणा दुर्घटना स्थळी पोहचू शकलेली नाही.
या बाबत अधिक माहिती अशी की महाबळेश्वर पासून जवळच असलेल्या केळघर परिसरातील रेंगडी वरोशी
या गावातील पाच शेतकरी आपल्या शेतील कामे आटोपून परतताना रस्त्यातील ओढा ओलांडत असताना ओढायचा प्रचंड प्रवाहात वाहून गेले असून यातील एका महिलेस वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले असून इतर चार जणांचा शोध सुरू होता. मात्र अंधार पडल्याने शोधकार्य
करताना अडचण होत असल्याने शोध कार्य थांबविण्यात आले आहे.
तर दुसऱ्या एका घटनेत महाबळेश्वर तालुक्यातील घवरी या गावी दरड अंगावर कोसळून अंकुश मारुती .सपकाळ या तरुणाला जीव गमवावा लागला आहे