HomeTop Newsजावली  तालुक्यातील सोसायट्याच्या कारभाराची चौकशी करा.-संदीप  पवार

जावली  तालुक्यातील सोसायट्याच्या कारभाराची चौकशी करा.-संदीप  पवार

सहाय्यक निबंधकांना शेतकऱ्यांचे  निवेदन सादर  सूर्यकांत जोशी  कुडाळ – जावली  तालुक्यातील दापवडी.रांजणी. घोटेघर.आलेवाडी यासह शेतकरी सभासदांच्या तक्रारी असलेल्या  विकास सेवा सोसायट्यांच्या कथित गैरविहाराविषयी चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी  मागणी शिवसेनेचे  जिल्हा  उपप्रमुख संदीप पवार यांनी केले आहे. या बाबतचे  निवेदन त्यांच्यासह  शेतकऱ्यांनी  जावली  तालुक्याचे सहाय्यक निबंधकांना  दिले आहे.

                दापवडी  विकास सेवा सोसायटीमध्ये कामकाजा संदर्भात अनेक त्रुटी आढळून  येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या बेकायदेशीरपणे कर्ज टाकने. ते परस्पर स्वतःच उचलने. शेतकऱ्यांची कोणतीही कर्ज मागणी नसताना हे प्रकार करणे. शेतकऱ्यास या कर्जाची कोणत्याही पद्धतीची माहिती नसणे.. अनेक शेतकरी सभासद पात्र नसताना सुद्धा त्यांच्या नावावर परस्पर कर्ज ची रक्कम उचलणे संपूर्ण गावामध्ये स्ट्रॉबेरीचे पीक अजिबात घेतले नसताना सुद्धा ते पीक दाखवून सातारा जिल्हा मध्यवर्तीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोट्या पद्धतीने पीक पाहणी अहवाल तयार करणे त्यांच्या शेतजमीन व पीक यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची संख्यात्मक दृष्ट ताळमेळ नसताना. कर्ज वितरण करणे. म्हणजेच पाच गुंठे शेती असताना तीन तीन लाखापर्यंत कर्ज वितरण करणे. अनेक जणांच्या नावावर कर्ज घेऊन नंतर शासनाच्या कर्जमाफीचा लाभ घेऊन तो स्वतः पदरात पाडून घेणे त्याचे त्या सभासदास कोणतीही कल्पना न देणे. परस्पर खोट्या सहीने.चलने तयार करणे रकमा . परस्पर हडप करणे. असले अनेक प्रकार  केलेले आहेत. असे या निवेदनात  नमूद  करण्यात आले आहे.

             शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज वितरण खोटे करून त्यांच्यावर 101 च्या कारवाई करण्याचा फार्स  करणे. कर्जात भरण्यात पैसे दिले असताना परस्पर त्याचा वापर करणे. कर्जदाराच्या खात्यावरून परस्पर पैसे विड्रॉल करणे. असे प्रकार सदरच्या सचिवांनी केलेले आहेत. सदरची बाब ही उघडकीस आल्यानंतर याची जबाबदारी तेथील लेखनिकाच्या नावाने ढकलण्यात आली आहे.तशा पद्धतीचे शपथपत्र बनवून दिशाभूल करणेचा प्रयत्न सुरु आहे. अशा प्रकारे  शेतकऱ्यांची फसवणूकच झाली आहे.असे विविध प्रकार येथील सचिवांनी केलेले आहेत. आपल्या कार्यालयाकडून त्यांची संपूर्ण चौकशी केली जावी. आणि जोपर्यंत चौकशी चालू आहे तोपर्यंत सदरच्या व्यक्तीला तिथून निलंबित करण्यात यावे अन्यथा कागदपत्रांमध्ये खोड खाड.फेरफार करण्याची शक्यता आहे.

              बाधित शेतकऱ्यांची नावे खालील प्रमाणे किसाबाई दत्तात्रय राजने. हिराबाई चंद्रकांत रांजणे. संदीप मोहन रांजणे मधुकर रामचंद्र रांजणे  विजय बाबुराव रांजणे संतोष भिकू रांजणे.  गंगाराम गुलाब रांजणे   सुरेश महादेव रांजणे.दत्तात्रेय राजाराम रांजणे.विलास गणपत रांजणे विजय कवी. गणेश कवी  याचबरोबर काही मयत व्यक्तींच्या  नावावर कर्ज घेतलेली आहेत.. असाच प्रकार घोठेघर व रांजणी येथील सोसायटीमध्ये झालेला आहे    . हनुमान   विकास सेवा सोसायटी आलेवाडी येथील अनेक जणांच्या नावावर शेती अथवा सभासद नसताना कर्ज वितरण करून त्यांचा कर्जमाफीमध्ये लाभ घेतलेला आहे.असे अनेक शेतकरी आहेत. असे प्रकार म्हणजे सहकार खात्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे. असल्या व्यक्तींच्या गैर कृत्यामध्ये विकास सेवा सोसायटी मोडीत निघायला वेळ लागणार नाही व त्यांचे शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान होत आहे यांच्या कृत्यामुळे शेतकरी देशोधडीला लागलेले आहेत. शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. यदा कदाचित जर शेतकऱ्यांनी या संदर्भात टोकाचे पाऊल उचलले तर त्याची संपूर्ण जबाबदारी या सचिवांवर राहील. याबाबत त्वरित आपण सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.असेही या निवेदनात  नमूद  करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular