जावली तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध ;३७ ग्रामपंचायती मध्ये निवडणुकीचे धुमशान सुरु
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील निवडणुक लागलेल्या ७५ ग्रामपंचायती पैकी तब्बल ३७ ग्रामपंचायतीची निवडणूक अंशतः / पूर्णतः बिनविरोध झाली आहे.३७ ग्रामपंचायतीची निवडणूक होत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी दिली आहे.
बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती
धनकवडी, पिंपरी तर्फ मेढा,करंडी तर्फ मेढा,करंजे, केंजळ,केसकरवाडी, केडंबे, बोंडारवाडी, भूतेघर, आंबेघर तर्फ मेढा,डांगरेघर, मोहाट, म्हाते बु.मुकवली, रेंगडेवाडी, वरोशी, गवडी, चोरांबे, दिवदेव, मामुर्डी, आखेगणी, आंबेघर तर्फ कुडाळ, महू,रांजणी,दापवडी,बेलोशी, खर्शी तर्फ कुडाळ, आर्डे, आपटी, कसबे बामणोली, कारगांव, मुनावळे, मौजे शे़बडी,उंबरेवाडी, इंदवली तर्फ कुडाळ, करंदी तर्फ कुडाळ, शेते अशा ३७ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
तसेच दुदुस्करवाडी ग्रामपंचायती साठी एकही अर्ज दाखल झाला नाही.बहुतांश गावात काही जागांसाठी अंशतः निवडणूक होत आहे.
तालुक्यातील ७५ ग्रामपंचायती साठी ७१४ अर्ज दाखल झाले होते,८९ जागांसाठी एकही अर्ज आला नाही. अनेक गावांत राखीव कँटेगिरीतील व्यक्ती नसल्याने जागा रिक्त राहिल्याचे दिसून येत आहे. छाननी मध्ये १७अर्ज अवैध ठरले असून ६९७ अर्ज वैध ठरले होते.अर्ज माघार घेण्याच्या दिवशी ११६ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले.५८१ अर्ज शिल्लक राहिले यातील,३३९ उमेदवार बिनविरोध निवडुन आले आहेत.२४२ उमेदवार निवडणूक रिंगणात असून एकूण ७२ प्रभागात निवडणूक होत आहे.
कुडाळ ग्रामपंचायतीसाठी तिरंगी लढत
तालुक्यातील कुडाळ ग्रामपंचायतीची साठी तब्बल ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पंधरा जागांसाठी याठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. या ठिकाणी तिन्ही पँनलची जोरदार मोर्चे बांधणी सुरु आहे.
याशिवाय भालेघर,बेलावडे, अंधारी/कास,या गावात एकही उमेदवार बिनविरोध निवडून आलेला नाही.