सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यासाठी आज कोरोना मुक्तीचा सुपर सोमवार ठरला आहे.आज तब्बल २५१ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.तर ४१ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.आज दोन मृत्यूची नोंद झाली आहे.एकूण मृतांचा आकडा १८७ झाला आहे.अॅक्टिव्ह रुग्ण संख्या आता ५३८ राहिली आहे.अशी माहिती जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.
मंगळवार पासून जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन आहे.प्रशासनाच्या प्रयत्नांना जावली तालुक्यातील जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने तालुक्यात सध्या कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत आहे.लाॅकडाऊन ही एक संधी समजून सर्वांनी काळजी पूर्वक नियमांचे पालन केल्यास या आठदिवसात जावली तालुक्यातून कोरोना हद्दपार होऊ शकणार आहे.
जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि.२२ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि.२३ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये ४१ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.यामध्ये आंबेघर तर्फे मेढा १,बाहुले २, जवळवाडी ३,मेढा ३, रेंगडी १, इंदवली २, खर्शीबारामुरे ५,पार्टेवाडी ५,.रांजणी ३,सायघर १,गांजले १, करंदी त.मेढा १,आलेवाडी ४,आनेवाडी २,नेवेकरवाडी १, पवार वाडी १, सायगांव ५ एकूण ४१.