सूर्यकांत जोशी कुडाळ – गेले दोन महिने कडक लॉकडाऊन करुन सुद्धा कोरोना बाधितांचे आकडे वाढत आहेत.आज कोरोना बाधितांना आकडा पुन्हा शंभरी पार गेल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
जावली तालुक्यातील छोटीमोठी गावे वाड्या वस्त्यांची, अजुनही काही वाडे गेल्या अनेक शतकांपासून एकभाऊपणाची साक्ष देत आहे.सुरुवातीला एका पूर्वजांचे बांधलेल्या या वाड्यात आज त्यांचे अनेक वंशज रहात आहेत.एका कुटुंबाची दहा वीस कुटुंबे तयार झाली.आणि अशा दाट वस्ती मुळे कोरोनाची संसर्ग साखळी तयार होत असल्याचे दिसून येत आहे.
जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात दि.३० रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व दि.३१ रोजी घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन टेस्ट मध्ये १०५ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.आज ३० जण कोरोना मुक्त झाले आहेत.कोरोना बाधितांची एकूण संख्या आता ६३४ वर पोहचली आहे.
आजच्या अहवालात कोरोना बाधितांची गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे तेटली १,केंजळ ४,केसकर वाडी ४,मेढा २,रेंडीमुरा १, बामणोली तर्फे कुडाळ १,घोटेघर १,हुमगांव १, खर्शीबारामुरे १, कुडाळ ३,महू ४, म्हसवे ११,पार्टेवाडी ७, शेते १०, शिंदेवाडी १,सोमर्डी १,कुसुंबी १, वागदरे १,आलेवाडी १२,आनेवाडी ८,भिवडी २,दरे बु.१, इंदवली १०, करंदी त.कुडाळ ८,सायगांव ७ सरताळे २ एकूण १०५.