Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात आज कोरोना मुळे दोन मृत्यूंची नोंद ; कोरोना बळींचा आकडा...

जावली तालुक्यात आज कोरोना मुळे दोन मृत्यूंची नोंद ; कोरोना बळींचा आकडा ३९ ; आज १४ जण बाधित ;

 

एकूण -१४०९, डिस्चार्ज १०८५, बळी ३९ ,अँक्टिव्ह २९५

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आता कोरोना बाधितां बरोबरच बळींचा आकडाही वाढू लागला आहे. सोमवारी हुमगाव येथील ७५ वर्षीय व्यक्तीचा कोरोना मुळे मृत्यू  झाला आहे.सदर व्यक्ती वर पुणे येथे रुग्णालयात उपचार सुरू होते. तसेच आज मेढा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल निझरे येथील ७० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू  झाला आहे.अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.

आज अँन्टीजेन टेस्ट मध्ये १४ जण कोरोना पाँझिटीव्ह ;

       आज केळघर प्राथमिक आरोग्य केंद्रात ९०  जणांची कोरोना अँन्टीजेन टेस्ट घेण्यात आली यामध्ये  मेढा ६,

निझरे ३,पैकी १ मृत्यू ,करंजे १,

भणंग १,रिटकावली १, खामकरवाडी १, ओझरे १,

अशा एकूण १४ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला असल्याची माहिती केळघर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ कवारे मॅडम यांनी दिली. 

           मेढा कोवीड सेंटर मध्ये सध्या १६  रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डाँ.प्रशांत सुतार यांनी दिली.

             दरम्यान सोमवारी शुभारंभ करण्यात आलेल्या मेढा येथील कोविड सेंटर मध्ये आज निझरे येथील एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू  झाला आहे.  या कोविड सेंटर मध्ये आज पहिला कोरोना बळी गेला आहे. हा  मृतदेह  नेहण्यासाठी शववाहिका अथवा अँम्ब्युलन्स लवकर न मिळाल्याने मृतदेह  रात्री साडे नऊ पर्यंत रुग्णालयातच होता. त्यानंतर मेढा  नगरपंचायतीच्या च्या माध्यमातून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page