;एकूण – १५३४ , डिस्चार्ज ११६९, बळी ४१ ,अँक्टिव्ह ३२५
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज सायगांव येधील कोरोना बाधित ६७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती सायगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप वळवी यांनी दिली आहे.
तालुक्यात आज २९ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. यामध्ये सायगाव 2,सरताळे 2,सर्जापूर 1,बामणोली त.कुडाळ 2, सोमर्डी 5,कुडाळ 2,मेढा 1,
म्हाते बु .1,सावली 6 ,करंजे 5,
सांगवी कुडाळ 2 यांचा समावेश असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.
कोरोनाच्या प्राप्त परिस्थितीशी झुंजण्यासाठी जनतेतून उठाव ;
. कोरोना मुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत शासनाच्या उपाय योजनांना मर्यादा पडत आहेत. उपचारा उभावी आपल्याच सग्यासोयर्यांची होणारी तडफड आणि डोळ्यादेखत जाणारे प्राण जनतेला असह्य होत आहे .
सुविधां बरोबरच औषधांचाही तुटवडा
आज पर्यंत बेड, अँम्ब्युलन्स, आँक्सिजन अभावी कोरोना
बाधितांचे प्राण जात होते .परंतू आता औषधांचाही तुटवडा जाणवत असल्याने प्रशासन आणि आरोग्य विभाग पुरता हतबल झाला आहे. गेल्या चार दिवसांत रेडमिसीवीर इंजेक्शन मिळणे कठीण बनले आहे. यातुनच काहीजण आपले उखळ पांढरे करुन घेत असल्याचीही चर्चा आहे.
सुविधांचा सुकाळ पण मनुष्यबळाचा दुष्काळ
सर्वसामान्य जनता सुविधा निर्माण करण्यासाठी लोक सढळ हाताने मदत करत आहेत. परंतु या परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी प्रशासनाकडे प्रशिक्षित मनुष्यबळाची वानवा आहे. एकीकडे सामाजिक बांधिलकी तून खाजगी डाँक्टर सहकार्यासाठी पुढे येत आहेत परंतु मुँहमांगे दाम देऊन कोविड सेंटरवर काम करण्यासाठी परिचारीका, वाँर्डबाँय, सफाई कामगार मिळेना झाले आहेत. शासन संभाव्य परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी पूर्ण अपयशी ठरले असल्याचीच आता जनतेतून भावना व्यक्त होत आहे. सहा महिन्यांपासून कोरोनाचे संकट घोंगावत असताना आरोग्य विभागातील रीक्त पदे भरली गेली नाहीत.उलट हे संकट लक्षात घेऊन अतीरीक्त आरोग्य अधिकारी व कर्मचारी तैनात ठेवणे आवश्यक होते. परंतू दूरचित्रवाणी वाहिण्यांवर केवळ पोपटपंची करुन आकड्याचे खेळ दाखवून भूलभूलैया नेत्यांनी केल्याची टीका आता विरोधकांसह आमजनतेतून होत आहे.
पुष्कर मंगल कार्यालयातील कोविड सेंटर चालविण्यासाठी प्रशासनाची असमर्थता , मंगलमूर्ती हाँस्पिटल ने जबाबदारी स्विकारली;
आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून सुरु करण्यात पुष्कर मंगल कार्यालयात सुरु करण्यात आलेले कोविड सेंटर चालविण्यासाठी प्रशासन असमर्थ ठरले. अखेर हे सेंटर चालवण्यासाठी खाजगी रुग्णालयाने जबाबदारी स्विकारली. हे मूर्तीमंत उदाहरण आहे.
कुडाळ येथे लोकसहभागातून कोविड सेंटर सुरू ;
लोकसहभागातून कुडाळ येथे आज इमरजन्सी कोरोना सेंटर चे उद्घाटन करण्यात आले आहे. सुरू करण्यात आले आहे . आँक्सिजन सह आठ बेडची सुविधा ग्रामस्थांनी निर्माण केली आहे. हे सेंटर चालवण्यासाठी आता प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
या बरोबरच अनेक गावचे सामाजिक कार्यकर्ते व मंडळे आँक्सिजन, आँक्सीमीटर, थर्मामीटर यासारखी उपकरणे देण्यासाठी पुढे येत आहेत. लोकांनी कोरोनाचे गांभीर्य ओळखले आहे.मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत.
कोरोना होऊच नये यासाठी खबरदारी घेतली पाहिजे ;
कोरोनाला रोखण्यासाठी लोकांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. अनावश्यक घराबाहेर पडणे टाळले पाहिजे, सभासमारंभ टाळले पाहिजे. सोशल डिस्टेन्सींग व मास्क वापर केला पाहिजे. कोरोना झाल्यावर परिस्थितीशी मुकाबला करण्यापेक्षा कोरोना होऊच नये यासाठी खबरदारी घेतली तर आणि तरच ही परिस्थिती नियंत्रणात येणार आहे. याचेही भान लोकांनी ठेवले पाहिजे.