जावली तालुक्यात कोरोना परिस्थिती सावरत असल्याचे चित्र – नियमांचे काटेकोर पालन आवश्यक
एकूण – बाधित ५२०८, डिस्चार्ज ३९९४, मृत्यू १२२, अॅक्टिव्ह १०९२
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात कोरोना बाधितांना आकडा आज काहीसा सावरताना दिसत आहे.आज एकूण ६३ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.यामध्ये केळघर विभागात बाधितांना आकडा आज ४५ आहे.तर दोन मृत्यूंची आज नोंद झाली आहे.गेल्या महिनाभरात अनेक गावांत समूह संसर्ग होताना दिसून येत आहे.यामागे कुठेतरी नियमांचे उल्लंघन होत असण्याची शक्यता आहे.सद्य स्थितीत केवळ नियम पाळणे हाच कोरोना पासून सुरक्षित राहण्याचा उपाय आहे.हे लोकांनी कायम ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.
जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज बामणोली क.१, शेंबडी २,आंबेघर तर.मेढा १,असती ४,भुतेघर ३,बोंडारवाडी ११,गवंडी २,करंजे ३,केळकर ६,कुरळोशी १,नांदगणे १,ओझरे २,पुनवडी १,तळोशी १०, कुडाळ १,सोमर्डी ३,वालूथ १, घरातघर १,आलेवाडी १,आर्डे २,बिभवी २,दुदुस्करवाडी २,सायगांव १,सरताळे १. एकूण ६३ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.
