एकूण ६३०२,डिस्चार्ज ५०१६ , म्रुत्यु १४९ , अँक्टीव्ह ११३७
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला आहे.कडक लॉकडाऊन आणि प्रशासनाचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत तसेच लोक काळजी घेत असताना सुद्धा कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने अधिक सतर्क राहावे लागणार आहे.या बरोबरच प्रशासनाने अधिक ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार दि ७ रोजी घेतलेले स्वाब व दि.८ रोजी घेण्यात आलेल्या अँटिजेन चाचणीत तालुक्यात १३९ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.तसेच आज तालुक्यात डिस्चार्ज देण्यात आले नाहीत.सुदैवाने आज मृत्यूची नोंद झाली नाही.
आज कोरोना पाॅझिटीव्ह अहवाल असलेले गाव निहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ; पावशेवाडी क. ३,वरसोळी १,रिटकवली ४,वाटंबे १,बिभवी १,बोंडारवाडी १ ,चोरांबे ४ ,गवडी १,जवळवाडी १६ ,केडंबे ४,मामुर्डी २ ,मेढा २३,ओझरे ४ ,सावली २ ,भणंग १,तळोशी १,कुडाळ ९, म्हसवे २,बामणोली त. कुडाळ ३ ,हुमगांव २,जरेवाडी १ ,महू १,पिंपळी ६ ,शेते १, सोमर्डी ६ ,दिवदिववाडी १,गांजे ८ ,म्हाते बु.१ ,मोहाट ९ ,पिंपरी त. मेढा २ ,भिवडी ५,आनेवाडी २ ,आर्डे १,बेलावडे १ ,सरताळे १ ,दरे बु.५ ,करंदी त. कुडाळ २,मेरुलिंग१ ,पानस १,सायगांव ५,एकूण १३९ .
Good news