जावली तालुक्यात आज तेरा जण कोरोना बाधित ,3 जणांना डिस्चार्ज
एकूण – ६९१, बळी २१, डिस्चार्ज ५२३, अँक्टिव्ह १४७
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज तेरा जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. या मध्ये हुमगांव 3,भिवडी 3,कुसुंबी १,कसबे बामणोली १,मेढा १,आंबेघर मेढा १,आनेवाडी ७७ अँटीजेन पैकी 3 अशा एकूण १३ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून आज तीन जणांना डिस्चार्ज मिळाला असल्याची माहिती जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.
जावली तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ज्यांच्या घरी स्वतंत्र राहण्याची पूर्ण व्यवस्था आहे असे कोरोना बाधित होम आयसोलेशन घेत आहेत.अशावेळी कोरोना बाधित आणि त्यांच्या कुटुंबियांनी अधिक काळजीपूर्वक रहाने आवश्यक आहे.
दरम्यान कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरीही बाजारपेठांतील व्यवहार पूर्ववत सुरु झाले आहेत. तालुक्यातील कुडाळ, मेढा, करहर, सायगांव या प्रमुख बाजारपेठांत आता ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. बहुतांश लोक स्वतः च्या सुरक्षेततेची काळजी घेत आहेत.
जावली तालुक्यातील तीन गावात आज कन्टेंमेंट झोनचे निर्बंध लागू – मिनाज मुल्ला
जावली तालुक्यातील गवडी, मेढा येथील प्रभाग क्र. ५, आंबेघर तर्फ मेढा या तीन गावात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार वरील तीन गावाला कोरोना बाधित रुग्ण आढलेल्या ठिकाणी निर्धारित नियमानुसार कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.