Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात आज दोन जणांचा कोरोना मुळे बळी ; बळींची संख्या ३३;...

जावली तालुक्यात आज दोन जणांचा कोरोना मुळे बळी ; बळींची संख्या ३३; आज २० जणांचा अहवाल कोरोना बाधित

एकूण -१२६१,डिस्चार्ज ९१८, बळी ३३ , अँक्टिव्ह ३१०

सूर्यकांत जोशी कुडाळ – ऐजावली तालुक्यात कोरोना बळींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बुधवारी  सायगांव १ व काटवली १ अशा दोन महिलांचा कोरोना मुळे मृत्यू झाला  असल्याची माहिती जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.

       तालुक्यात आज २० जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे.बामणोली कसबे ६,मेढा ९,रिटकावली १,

जवळवाडी १,ओझरे १, बेलोशी १, हुमगांव १  यांचा समावेश असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.

       जावली तालुक्यातील ७ गावात आज  कन्टेंमेंट झोनचे निर्बंध लागू – मिनाज मुल्ला

       जावली तालुक्यातील  हुमगांव, मेढा प्रभाग ६ व ७,  बेलोशी, काटवली, गणेशपेठ, केडंबे या  गावात  कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती  व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार वरील ७ गावात कोरोना बाधित रुग्ण आढलेल्या ठिकाणी  निर्धारित नियमानुसार  कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत  असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page