जावली तालुक्यात आज कोरोना मुक्तीचा दिवस ;२२ डिस्चार्ज;
आज कोरोना बाधित 0
एकूण – ६१२, बळी १९, डिस्चार्ज ४७६, अँक्टिव्ह ११७
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज कोरोनाने विश्रांती घेतली आहे. आज एकविसजणांचे आलेले सर्व कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.तर आज बावीस जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.
जावली पंचायत समिती आरोग्य विभागाच्या प्रसिद्धी पत्रका नुसार प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय कोरोना मुक्त पुढील प्रमाणे केळघर ५, कुडाळ ६, व सायगांव ११. अशी आहे. तर आज कुडाळ येथील कोरोना बाधितांच्या हायरिस्क काँन्टँक्ट मधील २८ जणांचे स्वाब घेऊन तपासणी साठी पाठवण्यात आले असल्याचे कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत वेलकर यांनी दिली .
कुडाळ बाजारपेठ सोमवारपासून पूर्ववत सुरू – विरेंद्र शिंदे
गेले काही दिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ बाजारपेठेतील व्यवहार बंद होते परंतु उद्या पासून बाजारपेठेतील सर्व व्यवहार पूर्ववत सुरू होणार असल्याचे निवेदन पुढील प्रमाणे.
*कुडाळ येथील सर्व ग्रामस्थ, नागरिक, व्यापारी, दुकानदार यांना कळविण्यात येते की*,
*गेली सहा महिने कोरोना विषाणू संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती वर आपण सर्वांनी विचार विनिमयाच्या माध्यमातून प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाच्या सांगण्यावरुन जे काही सहकार्य केले, त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो*.🙏🏻……
👉🏻 *मा. तहसीलदार सो. आणि पोलिस प्रशासन यांना केलेल्या विनंती वरून* ,
👉🏻 *गावातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या दुकाना व्यतिरिक्त* ,
👉🏻 *उद्या सोमवार दिनांक २४ आॅगस्ट २०२० पासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत *कुडाळ बाजारपेठेतील सर्व दुकाने आणि भाजी- पाला विक्री चालू ठेवण्यात येणार आहेत*….
*प्रामुख्याने व्यापारी आणि ग्रामस्थ यांनी अधिक काळजी घ्यावी*..
————————————–🙏🏻
*आपले नम्र,*
*मा.श्री.विरेंद्र शिंदे* *सरपंच*, *कुडाळ*.