एकूण – ९५८ , बळी २२, डिस्चार्ज ६२७ ,अँक्टिव्ह ३००
सूर्यकांत जोशी कुडाळ – आज सोमवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवाला नुसार जावली तालुक्यात २४ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे .अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.
यामध्ये उंबरवाडी १४,मेढा ६,केळघर १,सोनगाव २,दापवडी १ अशा चोवीस जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे.
दरम्यान तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राजकीय व सामाजिक कार्यकर्ते ,व्यापारी यांच्या वतीने उद्या मंगळवार पासून आठ दिवस कडकडीत बंद व जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले आहे. या आठ दिवसांत लोकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घरातून बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकांनी स्वयंशिस्त पाळल्यास कोरोना तालुक्यातून हद्दपार होईल.कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक होत असताना काही लोक जाणीव पूर्वक नियम पाळत नाहीत.त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा अधिक धोका आहे.
शासनाचे नियम न पाळणारांवर कडक कारवाई – तहसीलदार
सार्वजनिक ठिकाणी मास्क नसणाऱ्या तसेच सोशल डिस्टेन्सींग न पाळणार्या व्यक्ती व आस्थापनांवर प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा तहसीलदार शरद पाटील यांनी दिला आहे.