Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात आज १३ कोरोना बाधित

जावली तालुक्यात आज १३ कोरोना बाधित

जावली तालुक्यातील  सात गावात आज कन्टेंमेंट झोनचे निर्बंध लागू – मिनाज मुल्ला

 सूर्यकांत जोशी कुडाळ- जावली तालुक्यातील तेटली, भिवडी, बिभवी, जवळवाडी,शेते,हुमगांव, सायगांव या सात गावात  कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने 

 जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती  व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार वरील सात  गावाला कोरोना बाधित रुग्ण आढलेल्या ठिकाणी  निर्धारित नियमानुसार कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत  असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.

   एकूण – ६५२, बळी १९, डिस्चार्ज ५१३, अँक्टिव्ह १०७

 सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज तेरा जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. यामध्ये आनेवाडी येथील १०, कुसुंबी २, तेटली १  यांचा समावेश आहे.अशी माहिती तहसीलदार शरद पाटील यांनी दिली.

        दरम्यान गणेशवाडी येथील कोरोना योद्धा अंगणवाडी सेविकेच्या विम्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असुन साताराच्या शासकीय रुग्णालयातून आवश्यक कागदपत्रे मिळताच हा प्रस्ताव दाखल करण्यात येईल अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली. आज चार मोरघर येथील व तीन कुडाळ येथील कोरोना बाधिताना डिस्चार्ज देण्यात आला असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी सांगितले.

 आज गौरी व गणपतीचे विसर्जन

           प्रशासनाच्या सूचनांचे पालन  करून आज गौरी सोबतच घरगुती गणपतीचे काही लोकांनी विसर्जन केले.प्रथे प्रमाणे काही जण गौरी सोबत गणपतींचे विसर्जन करतात. तर काही जण सातवे दिवशी घरगुती गणपतींचे विसर्जन करतात. तर उर्वरित गणपतींचे  अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन केले जाते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page