Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात आज १४ कोरोना बाधितांची वाढ ;

जावली तालुक्यात आज १४ कोरोना बाधितांची वाढ ;

एकूण २०९२, डिस्चार्ज १८७१, बळी ५९ ,अँक्टिव्ह १६२

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात मंगळवारी रात्री  १४ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. यामध्ये आखेगणी १,आंबेघर तर्फ मेढा ५,केडंबे २,गांजे १, लिंगाडेवाडी २, मेढा १, सांगवी मेढा १, मालचौंडी १, यांचा समावेश आहे.अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

कोरोना सोबत जगण्याची सज्जता

        कोविड 19 या आजाराच्या लक्षणांबाबत सुरुवातीला जनता अज्ञान होती. तर त्यावर लस किंवा औषध नसल्याने या आजाराचे गांभीर्य आणि भिती सुरुवातीला होती.शासनाच्या माध्यमातून या आजारा बाबत केलेल्या मार्गदर्शक सूचनांमुळे लोक सावध झाले. लोकांना आजाराची लक्षणे त्यासाठी चे उपाय आणि घ्यायची काळजी समजू लागली. 

           सप्टेंबर मध्ये कोरोनाच्या आलेल्या लाटेने लोकांना बरेच काही शिकवले.आजाराचे गांभीर्य समजलेच पण त्या बरोबरच माणूसकी ही शिकवली. लोकांनी लोकसहभागातून लोकांसाठी सुविधा निर्माण केल्या.लोकांच्या एकजूटी मुळेच  आज कोरोनाला हरवणे शक्य झाले असेच या महिन्यात पूर्णपणे आटोक्यात आलेल्या कोरोनाच्या आकडेवारीने दिसून येत आहे. या महिन्यात कोरोनाचा धोका कमी झाला आहे परंतू कोरोना गेलेला नाही. अगदी लस आली तरीही तो लगेच जाईल असेही नाही. अजून काही महिने काही वर्षे आपल्याला ही लढाई सावधगिरी बाळगून लढावी लागणार आहे. आणि लोक तशी काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे.

           सध्या नवरात्रोत्सव सुरु आहे. परंतु लोकांनी आपल्या परंपरागत श्रद्धा जपत धार्मिक विधी सुरू ठेवले आहेत. देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जाता येत नाही परंतु तोच देव लोकांनी आपल्या ह्रदयात साठवून त्याची पूजा करत आहेत.यावरून लोक किती सावधगिरी बाळगत आहेत हेच दिसून येते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page