जावली तालुक्यात आज १९ जणांचा अहवाल कोरोना बाधित ;शनिवारी ३१ तर आज पाच जणांना डिस्चार्ज
एकूण -७१२, बळी २१, डिस्चार्ज ५५७, अँक्टिव्ह १३४
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज तब्बल १९ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. या मध्ये आंबेघर तर्फ मेढा येथील १२ व गवडी येथील ७ जण आहेत.अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.
जावली तालुक्यातील तीन गावात आज कन्टेंमेंट झोनचे निर्बंध लागू – मिनाज मुल्ला
जावली तालुक्यातील भोगवली तर्फ कुडाळ, मेढा येथील प्रभाग क्र. १२, कसबे बामणोली या तीन गावात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार वरील तीन गावाला कोरोना बाधित रुग्ण आढलेल्या ठिकाणी निर्धारित नियमानुसार कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.
कोरोनाचा फैलाव वाढला , पण लोकांच्या मनातील भिती कमी झाली
दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. मार्च ते जून पर्यंत कोरोना काही मर्यादेत होता.शहराकडून गावाकडे येणारे लोक कोरोना पाँझिटीव्ह सापडत होते.त्याकाळी लोकांच्या मनात कोरोना बाबत भिती होती. आपल्या गावात कोरोना येऊ नये म्हणून गावपातळीवर अनेक उपाययोजना केल्या जात होत्या. लाँकडाऊनच्या निर्बंधामुळे सर्व चिडीचूप होते.त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा सुद्धा नियंत्रणात होता.
जुलै आणि आँगष्ट महिन्यात मात्र कोरोनाचे रूप बदलले.शहरापुरता मर्यादित असणारा कोरोना गावात दाखल झाला. आता बाधित आढळणाऱ्या रुग्णाना कोणत्याही प्रवासाचा अथवा कोणाच्या संपर्काचा संदर्भ लागत नाही. यातूनच सामाजिक संसर्गाचा धोका निर्माण झाला.
याच दरम्यान सरकारने अन् लाँक सुरू केले वाजारपेठांतील ज्या प्रमाणात गर्दी वाढत गेली. त्या पेक्षा जास्त प्रमाणात कोरोना बाधितांचे आकडे वाढत चालले आहेत. सुरूवातीला अनेक कोव्हिड केअर सेंटर बाधित रुग्ण नसल्याने ओस पडली होती. पण आज कोरोना बाधितांचा दाखल करुन घेण्यासाठी कोव्हिड केअर सेंटर तसेच रुग्णालये कमी पडत आहेत. अशी गंभीर परीस्थिती निर्माण होऊ लागली आहे.
एकीकडे कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना दुसरी कडे लोकांच्या मनातील कोरोना बाबतची भिती कमी झाली आहे. अनेक बाधिताना कोणतीही लक्षणे नाहीत. लक्षणे नसलेल्या कोरोना बाधितांचे अनुभव लोकांपर्यंत पोहचत असल्याने लोकही कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत असेच एकंदरीत बाजापेठांत तसेच अन्य ठिकाणी असणारी वर्दळ पाहता दिसून येते.
अशी परिस्थिती असली तरीही लोकांनी कोरोना मुळे जीव गमावलेल्या तसेच अत्यवस्थेत असलेल्या व गंभीर परिस्थिती तून बाहेर आलेल्या रूग्णांचे अनुभव दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यामुळे संपूर्ण जग कोरोनाचे चटके सहन करत असल्याने लोकांनी कोरोना संसर्गा पासून स्वतःला वाचवण्यासाठी सावधगिरी बाळगणे हिताचे ठरणार आहे.