; जावली तालुक्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा कहर ; १०११ बाधित ; पैकी २४ जणांचा मृत्यू ;
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात सप्टेंबर महिन्यात तब्बल १०११ जण कोरोना बाधित झाले तर चोवीस कोरोना बाधितांचा मृत्यू एका महिन्यात झाला आहे.सप्टेंबर अखेर एकूण कोरोना बाधित १७५६ असून पैकी १२५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.कोरोना मुळे ४४ जणांना प्राण गमवावे लागले आहेत ,तर ४५५ अँक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी भणंग येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.आज २५ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. यामध्ये ओझरे २, पवारवाडी २, सावंतवाडी तर्फ कुडाळ २,सोमर्डी ५, बामणोली १,सर्जापूर १, मेढा २, कुडाळ १, मोहाट ३,भणंग १, दरे बु. २, दुदुस्करवाडी १ , हुमगाव १, तांबी कुसुंबी १, व निझरे १ या प्रमाणे असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.
तालुक्यात एप्रिल महिन्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला. त्यानंतर ३१ आँगष्ट पर्यंत पाच महिन्यात ७४५ जण कोरोना बाधित झाले होते तर २१ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला होता.त्यामुळे सप्टेंबर महिन्यात तालुक्यात कोरोनाचा प्रचंड उद्रेक झाल्याचे दिसून येत आहे. दररोज वाढणारे कोरोना बाधितांचे आकडे आणि उपचारा अभावी आपल्याच सग्यासोयर्यांचे तडफडून होणारे मृत्यू मन हेलावून टाकणारे होते
यापरिस्थितीत अपूरी आरोग्य व्यवस्था आणि प्रशासकीय यंत्रणे्वर येणारा ताण पाहुन सर्वसामान्य जनतेतून उठाव झाला. अनेक सामाजिक कार्यकर्ते व देणगीदार आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी पुढे आले.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने मेढा ग्रामीण रुग्णालयात डीसीएचसी सेंटर सुरू केले. तहसीलदार शरद पाटील व गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी मदती साठी केलेल्या आवाहनाला जनतेतून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून मेढा कोविड सेंटरसाठी डिजिटल एक्सरे मशीन देण्यात आली .तर अनेक
सामाजिक संघटना, देणगीदार यांच्या माध्यमातून आँक्सिजन मशीन , बेड, यासह अत्यावश्यक साहित्य व रोख रक्कम देणगी स्वरूपात जमा करण्यात आले.
रायगांव येथील कोविड सेंटर मध्ये संस्थात्मक आयसोलेशन ची व्यवस्था आहे. याठिकाणी २१७, बेड असून ७८ रुग्ण संस्थात्मक आयसोलेट आहेत , १३९ बेड रिकामे आहेत . मेढा येथे आता डीसीएचसी सेंटर मध्ये आँक्सिजन युक्त तीस बेडजी व्यवस्था करण्यात आली आहे.याठिकाणी सतरा कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मेढा कोविड सेंटरमुळे अत्यवस्थ रुग्णांना दिलासा मिळाला आहे. लक्षणे नसलेले रुग्ण होम आयसोलेशन होत आहेत. त्यामुळे प्रशासन व आरोग्य यंत्रणे वरचा ताण कमी होत आहे. परंतु होम आयसोलेट रुग्ण आणि नातेवाईकांनी अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.
गेल्या सत्तर वर्षात शासनाला ज्या आरोग्य सुविधा निर्माण करणे सुचले नाही व जमले नाही ते लोकांनी सात दिवसात निर्माण करुन दाखवले.कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकसहभागातून आँक्सिजन युक्त आठ बेडचे इमर्जन्सी कोविड केअर सेंटर तयार करून प्रशासनाकडे देण्यात आले आहे. याच धर्तीवर आता अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना रुग्णांसाठी लोकसहभागातून व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे.यासुविधा भविष्यात सुद्धा अत्यावश्यक आरोग्य सेवा देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
लोकांनी लोकांच्या साठी निर्माण केलेल्या सुविधा सुरु राहण्यासाठी शासनाने आता प्राथमिक आरोग्य केंद्रात तज्ञ वैद्यकीय अधिकारी व पुरेसे आरोग्य कर्मचारी तैनात ठेवणे आवश्यक आहे.