एकूण – १०५१ , बळी २५, डिस्चार्ज ७५९ ,अँक्टिव्ह २६७
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज ४० जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. तर आज तब्बल ८५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली .
यामध्ये कुडाळ ७, पिंपळी २, केळघर २, सायगांव ५, मेढा ७, उंबरवाडी ९, घोटेघर ५,करंदोशी १, सावली १.राणगेघर १ एकूण ४० जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे.
दरम्यान आज रायगांव कोविड सेंटर मधील एका कोरोना बाधितांची तब्येत अचानक बिघडल्याने या रुग्णाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते,उप सभापती सौरभ शिंदे यांच्या सह सामाजिक कार्यकर्त्यांनी आटोकाट प्रयत्न करुन ही बेड उपलब्ध झाला नाही. त्यामुळे या रुग्णाला तातडीने आँक्सिजन ची आवश्यकता असल्याने रायगांव येथेच पुढील व्यवस्था होई पर्यंत तात्पुरती आँक्सिजन सुविधा उपलब्ध करण्यात आली.अथक प्रयत्नानंतर आ.शिवेंद्रसिंहराजेंच्या भोसले यांच्या मदतीने सातारा येथील खाजगी रुग्णालयात बेड उपलब्ध झाला असल्याची माहिती उपसभापती सौरभ शिंदे यांनी दिली
त्यामुळे कोरोना ची सध्याची परिस्थिती किती गंभीर आहे याचे भान लोकांनी ठेवणे आवश्यक आहे.
दरम्यान कोरोना बाधितांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून अनेक दानशूर व्यक्तींचे मदती साठी हात पुढे येत आहेत. हे संकट खूप मोठे असून दीर्घकाळ राहणारे आहे. आपण निर्माण केलेल्या सुविधा आपल्याच ज्ञाती बांधवांना उपयोगी ठरणार असल्याने जास्तीत जास्त लोकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
