Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात आज ४० पाँझिटीव्ह ; ८० डिस्चार्ज ;

जावली तालुक्यात आज ४० पाँझिटीव्ह ; ८० डिस्चार्ज ;

एकूण -१३८१, डिस्चार्ज १०३८, बळी ३५ , अँक्टिव्ह ३०८

 सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज ४० जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे.  या मध्ये बामणोली १,मेढा ३, रायगांव २,आनेवाडी ३, सरताळे ५, सर्जापूर ३, कुडाळ ९, करंदी १, सोमर्डी १, ओझरे ९, बेलोशी २, हुमगाव १ यांचा समावेश असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.

मेढा ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटरचा सोमवारी शुभारंभ

              कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मेढा येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटर सज्ज झाले आहे. उद्या सोमवार दि. 20 रोजी सकाळी 11 वाजता मेढा ग्रामीण रुग्णालय येथे कोव्हिड केअर सेंटरचा शुभारंभ आणि आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे तर्फे रुग्णालयास दिलेली डिजिटल एक्स रे मशीन लोकार्पण करण्यात येणार आहे.

               यासुविधे मुळे जावलीतील कोरोना बाधितांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. आँक्सिजन सह बेड वेळेत मिळत नसल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशावेळी ग्रामीण रुग्णालयात होत असलेली ही सुविधा निश्चितच प्रभावी ठरणार आहे. ही सुविधा निर्माण झाली असली तरीही सुजाण जनतेने आपल्याला या ठिकाणी जायला लागूनच नये यासाठी दक्ष रहाणे आवश्यक आहे.

      दरम्यान प्रशासनाच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटरसुरु होत असताना त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यासाठी सुद्धा जावलीतील अनेक मदतीचे हात पुढे आले आहेत. त्याच बरोबर अनेक सामाजिक कार्यकर्ते व देणगीदार यांनी स्थानिक स्तरावर आँक्सिजन मशीन, मास्क सँनिटायझर यासह सुविधा निर्माण केल्या आहेत.

           कुडाळ येथेही लोकसहभागातून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आँक्सिजन सह आठ बेडचे कोविड सेंटर सज्ज करण्यात आले आहे. यासाठी कुडाळच्या युवकांनी पुढाकार घेऊन केलेल्या या उपक्रमाला सर्वस्तरातील देणगीदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page