जावली तालुक्यात आज ४६ जणांचा अहवाल कोरोना बाधित
मेढा शहर बनले कोरोना हाँटस्पाँट
मेढा कोरोना बाधितांचे शतक पूर्ण
एकूण – ८६४, बळी २१, डिस्चार्ज ६१६ ,अँक्टिव्ह २२७
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज ४६ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.आज ९ जणांची कोरोना वर मात.
तालुक्याचे मुख्यालय असलेले मेढा शहर आता कोरोनाचे हाँटस्पाँट बनले आहे. पुनवडी नंतर आता मेढ्याने कोरोना बाधितांचे शतक पूर्ण केले आहे. आज अँन्टीजेन टेस्ट मध्ये मेढा येथील २० जणांचा तर स्वाब मध्ये ५ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला असून मेढ्याची कोरोना बाधितांची आज पर्यंतची एकूण संख्या १२० वर पोहचली आहे. तर मेढ्याचाच अविभाज्य भाग असणाऱ्या जवळवाडी येथील आज सहा जणांचा अहवाल कोरोना बाधित आला असून जवळवाडी एकूण कोरोना बाधितांची संख्या २३ वर पोहचली आहे. तसेच आज दापवडी गावात पुन्हा एक जणाचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. यापूर्वी दापवडी मध्ये १७ कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. याशिवाय आज कसबे बामणोली २, बामणोली तर्फ कुडाळ ४, हुमगांव ६ , आनेवाडी १ , करहर १,अशा आज एकूण ४६ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. याच बरोबर अजुन एका लँबला पाठवलेले स्वाबचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. अशी माहिती गटविकास अधिकारी बुद्धे यांनी दिली. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे.
यापूर्वी तालुक्यात पुनवडी गावात सर्वाधिक १६५ जणांचा कोरोना अहवाल पाँझिटीव्ह आला होता. आता त्यानंतर मेढा शहराने तीन अंकी संख्या गाठली आहे.दररोज पूर्वीच्या गावांबरोबरच नवीन गावांमध्ये कोरोना दाखल होत आहे. जी गावे अजूनही कोरोना पासून दूर आहेत ते आपल्या ग्रामदैवतावर भरोसा देत या संकटा पासून दूर ठेवण्याची प्रार्थना करत आहेत.
जावली तालुक्यातील तीन गावात आज कन्टेंमेंट झोनचे निर्बंध लागू – मिनाज मुल्ला
जावली तालुक्यातील आंबेघर तर्फ कुडाळ , भणंग, भिवडी या तीन गावात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार वरील तीन गावाला कोरोना बाधित रुग्ण आढलेल्या ठिकाणी निर्धारित नियमानुसार कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.
सर्वांनी स्वतः ची जास्तीत जास्त काळजी घ्यावी. नियमांचे पालन करावे, मास्क व सोशल डिस्टेन्सींग ठेवावे असे आवाहन प्रशासना तर्फे करण्यात येत आहे.