सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज ५५ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.तसेच आज ४९ जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत.तालुक्यात अॅक्टिव्ह रुग्ण ५५० आहेत अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली आहे.
दि.२८ रोजी घेण्यात आलेल्या स्वाब व अॅन्टीजेन टेस्ट मध्ये ५५ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे.यामध्ये गावनिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे ;भणंग ४,बिभवी ६,मेढा ५,रेंगडी १, कुडाळ २,म्हसवे १,पार्टेवाडी१, रामवाडी २,शेते २, सोमर्डी ३,दिवदिववाडी १,सायली १,वागदरे १०,आलेवाडी १,आनेवाडी १, इंदवली ४,करंदोशी २,महामुलकरवाडी १,प्रभुचीवाडी २,सायगांव २. एकूण ५५.
