जावली तालुक्यात आज ७ कोरोना बाधित ; ६ डिस्चार्ज
एकूण – ६१७, बळी १९, डिस्चार्ज ४८२, अँक्टिव्ह ११६
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज आनेवाडी येथील पाच जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे.अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.
कुडाळ येथील ६ जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत.दरम्यान तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या हायरिस्क काँन्टँक्ट मधील ९६ जणांच्या स्वाबचे अहवाल लँबला पाठवण्यात आले होते पैकी दोन जणांचा कोरोना बाधित आला आहे अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते यांनी दिली.परंतू हे दोन्ही रुग्ण सातारचे रहिवासी आहेत. फक्त स्वाब जावलीत घेतल्याचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी नमूद केले.
आनेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी एक कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर आज शंभर लोकांची अँन्टीजेन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये पाच जणांचा अहवाल कोरोना बाधित आला .त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाला दूर ठेवलेल्या आनेवाडीत कोरोनाने शिरकाव केला आहे.
कुडाळ येथे आज सात जणांची कोरोना अँन्टीजेन तपासणी करण्यात आली. परंतु सर्व अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत वेलकर यांनी दिली.