HomeTop Newsजावली तालुक्यात एकल वापर प्लास्टिक पिशवी वापरावर जनजागृती मोहीम -पर्यावरणाला हानी पोहचवणाऱ्या...

जावली तालुक्यात एकल वापर प्लास्टिक पिशवी वापरावर जनजागृती मोहीम -पर्यावरणाला हानी पोहचवणाऱ्या प्लास्टिकला हद्द पार करा डॉ निलेश पाटील,

कुडाळ -.कुडाळ ता जावली येथे एकल प्लास्टिक वापर बंदी बाबत जनजागृती करणेत आली. तालुक्यात पर्यटनाच्या दृष्टीने अनेक पर्यटक येत असतात. प्लास्टिक कचऱ्यामुळे गावात अस्वच्छता दिसू नये, तसेच पर्यटकांवर अस्वच्छतेचा दुष्परिणाम होऊ नये यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करावा अथवा करूच नये असे आवाहन गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी ग्रामस्थ, दुकानदार, विक्रेत्यांना दिल्या. शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात प्लास्टिक वापरा बाबत जनजागृती व दंडात्मक कारवाई सुरू आहे. त्या अनुषंगाने कुडाळ ता जावली प्लास्टिक जनजागृती मोहीम घेण्यात आली. यावेळी किराणा दुकानदार हॉटेल, इतर व्यवसायिक यांचेकडील प्लास्टिक कॅरीबॅग, चिकन विक्रेते कडील काळी बॅग, चहाचे डिस्पोजल ग्लास, प्लास्टिकचे डिस्पोजल ग्लास, इत्यादी. प्लास्टिक ग्रामपंचायतीकडून जप्त करणे ची कारवाई करणेत आली. तसेच यानंतर प्लास्टिक कॅरी बॅग,पिशवी, डिस्पोजल कप डिस्पोजल ग्लास नं वापरणेच्या सूचना करणेत आल्या व नोटीस देणेत आली.तसेच जमा केलेले प्लास्टिक बॅग कचरा वेचक (भंगार वाले ) अंबिका स्क्रॅप मर्चंट, कुडाळ यांच्याकडे रिसायकल साठी (पुनर्वापर) देण्यात आले. यावेळी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन तपासणी पथक प्रमुख श्रीम. हेमलता चव्हाण मॅडम विस्तार अधिकारी (कृषी), स्वच्छता विभागाचे जिल्हा तज्ञ श्री. अजय राऊत सर, तालुका समन्वयक श्री. संतोष जाधव, मनोज खेडकर,महेश जाधव ग्रामपंचायत सदस्य दिलीप वारागडे, ग्रा.पं. कर्मचारी श्री. रवींद्र कांबळे, अनिल पुजारी, गणेश भिसे, लालसिंग भिसे, संतोष बुधवाले,जयश्री शेवते. जयश्री कांबळे, नंदा माळेकर. दिलशाद मनेर. पुष्पलता दीक्षित. अनिता पांडागळे. अरुणा गुजर.अंगणवाडी सेविका, आशा सेविका उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular