Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यात कोरोनाचा २७ वा बळी ;आज १५ पाँझिटीव्ह, ८५ डिस्चार्ज

जावली तालुक्यात कोरोनाचा २७ वा बळी ;आज १५ पाँझिटीव्ह, ८५ डिस्चार्ज

 जावली तालुक्यात आज कोरोनाचा २७ वा बळी ; आँक्सिजन व व्हेंन्टिलेटर नसल्याने जातोय प्राण       आज १५ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह ; ८५  जण कोरोना मुक्त

एकूण – ११६७ , बळी २७, डिस्चार्ज ८९२ ,अँक्टिव्ह २४८

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात रविवारी आर्डे तालुका जावली येथील  कोरोना बाधित ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू  झाला असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.

        याबाबत आर्डे येथून मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहिती नुसार संबंधित व्यक्तीला शारिरीक त्रास जाणवू लागल्याने कुडाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते.याठिकाणी त्यांची अँन्टीजेन कोरोना  टेस्ट पाँझिटीव्ह आली.त्यामुळे त्यांना रायगांव येथील कोविड केअर सेंटरला दाखल करण्यात आले. परंतू श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना पांचगणीच्या कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले.परंतू तिथे आँक्सिजन व व्हेंटिलेटरचा बेड उपलब्ध नसल्याने नातेवाईकांना रुग्णासाठी असा बेड उपलब्ध करण्यासाठी सूचना करण्यात आली.नातेवाईक, प्रशासन आणि आरोग्य विभागाचे बेड मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच या रुग्णाचा  मृत्यू  झाला. असे सांगण्यात आले.

आज १५ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह ;

 जावली तालुक्यातील पंधरा जणांचा अहवाल आज कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. यामध्ये कसबे बामणोली ३, सावली ३, भणंग ३, मेढा २, केळघर १,केडंबे 3 यांचा समावेश  आहे. आज कोरोना मुुुक्त झालेेल्य्या् ८५ जणाना डिस्च्चार््ज देेेण्य्या्यात आला

असल्याचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी सांगितले.

जावली तालुक्यातील ५ गावात आज  कन्टेंमेंट झोनचे निर्बंध लागू – मिनाज मुल्ला

       जावली तालुक्यातील  मेढा येथील प्रभाग १० , मोरघर, करंदी तर्फ कुडाळ,आपटी,सायगांव या ५  गावात  कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती  व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार वरील ५ गावात कोरोना बाधित रुग्ण आढलेल्या ठिकाणी  निर्धारित नियमानुसार  कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत  असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.

आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी जावलीकर एकवटले

       दरम्यान जावली तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी लोक सहभागातून मोठ्या प्रमाणात उपाय योजना करण्यात येत आहेत. सर्वसामान्य लोक स्वतः होऊन मदती साठी पुढे येत आहेत. मेढा येथे लवकरच सर्व सोयींनी युक्त कोविड रुग्णालय सुरु करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार शरद पाटील यांनी दिली आहे.तसेच कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आँक्सिजन व व्हेन्टिलेटर युक्त बेड युक्त वाँर्ड तयार करण्यासाठी कुडाळ ग्रामस्थांकडुन मोठ्या प्रमाणात मदतीचे हात पुढे येत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page