जावली तालुक्यात कोरोनाचा जोर पुन्हा वाढला ; आज १७४ जण बाधित : ५ मृत्यूंची नोंद
एकूण : बाधित – ५०७२ ,डिस्चार्ज ३८६४, मृत्यू११४, अॅक्टिव्ह १०९४
सूर्यकांत जोशी कुडाळ – गेले दोन दिवस जावलीकरांना कोरोनाने काहीसा दिलासा दिला होता. परंतू मंगळवारी रात्री आलेल्या अहवालाने जावलीकरांची पुन्हा झोप उडवली आहे. दि.२५ व २६ रोजी घेतलेल्या स्वाब व अन्टिजेन टेस्ट मध्ये तब्बल १७४ जणांचा अहवाल कोरोना पाँसिटीव्ह आला आहे.तर एप्रिल महिन्यात झालेल्या पाच मृत्यूची नोंद झाली आहे . त्यामुळे तालुक्यातील मृत्यूचा आकडा ११४ वर पोहोचला आहे . मंगळवारी तालुक्यात डिस्चार्ज झाले नाहीत .
जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतिश बुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री मिळालेल्या अहवालात अंधारी १,शेंबडी १,तेटली १,आंबेघर तर्फे मेढा ११, बोंडारवाडी ११, चोरांबे २,डांगरेघर १,जवळवाडी ३,केळघर ३,केसकरवाडी ३,कुरोळशी ३,मामुर्डी १,मेढा १४,मुकवली २,ओझरे २,पुनवडी १,सावली १, आखाडे ३,बामणोली त.कुडाळ ३, हातगेघर १, हुमगांव १,करहर१, खर्शीबारामुरे १,कुडाळ ५, महु ३, म्हसवे २, पिंपळी २, सायघर १,शेते ९,सोमर्डी ३,विवर १, वालुथ १,दिवदिव १-२२/४/२१ मृत्यू.दिवदिव वाडी १, कुसुंबी ६,मालचौंडी २ पैकी १ मृत्यू -६/४/२१,मोहाट १,वाघेश्वर 2,आलेवाडी 2,आनेवाडी 1, बेलावडे 1, भिवडी 13,दरे बु.16, दरे खु.1, दुदुस्करवाडी 2,करंदी त. कुडाळ 2,खर्शी त. कुडाळ 1 मयत दि.21/4/21, महामुलकरवाडी 1, महिगांव 8, मार्ली 1, मेरुलिंग 1, रायगांव 5, रानगेघर 1, सायगांव 2, सरताळे 4,एकूण 174 जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. तर एप्रिल महिन्यातील 5 मृत्यू ची नोंद झाली आहे.
दररोज नवनवीन गावे कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहेत.तसेच मृत्यूंची आकडेवारी वाढत आहे.नियमांचे काटेकोर पालन, कोणतीही लक्षणे दिसताच तातडीने कोरोना चाचणीत करणे, लसीकरण करुन घेऊन स्वसंरक्षण करणेच हितावह ठरणार आहे.
बाजारपेठेतील गर्दी कोरोनाला निमंत्रण देणारीच.
शासनाने अत्यावश्यक सेवां दुकानं केवळ सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरु ठेवली आहेत.परंतु ग्रामीण भागातील ग्राहक सकाळची घरातील कामे धारा,दुध उरकुन बाजारपेठेत येण्यासाठी ९ वाजत आहेत.त्यामुळे सकाळी ९ ते ११ या वेळेत दुकाने आणि भाजी मंडईत खरेदी साठी झुंबड उडत आहे.जावली तालुक्यातील प्रमुख बाजारपेठांच्या गावात तसेच परिसरात गावोगावी कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट होत आहे.असे असताना ही होणारी गर्दी कोरोनाला निमंत्रण देणारीच ठरणार आहे.दुकाने दिवसभर सुरू राहिल्यास दिवसभर रहदारी सुरू राहिली तरी गर्दी होणार नाही असा मतप्रवाह व्यापारी आणि जनतेतून व्यक्त होत आहे.
या कोरोना बातमी पत्राचा उद्देश लोकांना घाबरवण्यासाठी नाही तर सावध करण्यासाठी आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेत या बातमी पत्राद्वारे कोरोना बाबतची खरी वस्तूस्थिती मांडली जात होती . त्यामुळे वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोकाग्रहास्तव पुन्हा हे बातमीपत्र सुरू केले आहे. यामध्ये प्रशासनाकडून मिळणारी माहिती, सूचना, आरोग्य सेवेबाबत लोकांच्या अडचणी आणि आवश्यकता याबाबत प्रशासन आणि जनता यामध्ये समन्वय साधण्यासाठी प्रयत्न केला जात आहे .